नवीन लेखन...

आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि युवकांची भूमिका

“धर्मांधतेने आणि धार्मिक कट्टरवादाच्या विषवृक्षाला आलेली गोंडस पण सर्वनाशाकडे  नेणारी फळे म्हणजे दहशतवाद होय.” धर्मांध मुल्ला-मौलवींच्या शिफारशीने राजकीय सरंक्षण प्राप्त झालेल्या दहशतवादाला आज तथाकथित देश ‘जेहाद’ च्या नावाखाली स्वातंत्र्ययुद्ध संबोधतात.

धर्मांधता इ.स.पूर्व काळापासून अस्तित्वात आहे. शेकडो आक्रमकांनी हजारो वर्षांपासून भारतीय संस्कृतीला संपविण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. हा दहशतवादाचाच भाग आहे, लक्षावधी निरपराध व्यक्तींच्या रक्ताने या भूमीवर न पुसणारे डाग पाडले जात आहेत.

“भारतीयांची समस्त श्रद्धास्थाने निखंदून काढल्याशिवाय कोणीही इस्लामचा स्वीकार करणार नाही.” ही मूळ संकल्पना लक्षात घेऊन, दहशतवादी कारवायांना मूर्त रूप दिले जात असल्याची अनेक उदाहरणे पहावयास मिळतात. दहशतवाद्यांच्या कृत्यांचे कोणीही भारतीय मुस्लीम समर्थन करीत नाही ह्याची राष्ट्रविघातक शक्तींनाही कल्पना आहे. जगामध्ये सत्तास्पर्धा सुरु झाल्यावर धार्मिक कट्टरवाद्यांना राजकीय सरंक्षण मिळत गेले. एका देशातील समाजविघातक तत्व दुसऱ्या देशातील घटनांचा पाठपुरावा करत राहिले. त्यानंतर मात्र आर्थिक सत्तेच्या लालसेपायी अमेरिकेने दहशतवादाला पोसण्याचे कुकर्म केले. इराकचा सद्दाम हुसैन, अफगाणिस्थानातील ओसामा बिन लादेन, डा.जवाहिरी, अफजल गुरु, दाउद इब्राहीम तसेच मुंबई हल्ल्यातील कसाब हे अमेरिकेने लावलेल्या विषवृक्षाला आलेली फळे होत. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या देशातील राजकारणात हस्तक्षेपाच्या निमित्ताने अमेरिकेची दहशतवादाला मदत मिळत राहिली.

दुसऱ्या महायुद्धानंतर ‘मुस्लीम ब्रदरहूड’ संकल्पना जोर धरू लागली. यासाठी अब्दुल्ला आजम आत्मघातकी युवकांची जमवाजमव करीत होता, त्याला कायमचे नमविण्याचा एकसंघ रशियाने निर्धार केला होता. परंतु साम्यवादी शक्तींना शह देण्यासाठी अमेरिकेने, पाकीस्थानच्या आय.एस.आय. या गुप्तचर संघटनेला शस्त्रास्त्रे व पैसा पुरविणे सुरु ठेवले होते. ही गुप्तचर संघटना, रशियन सीमेत अफगाणी युवकांच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया करत होती. यामुळे रशियन सैन्याला १९९८ मध्ये अफगाणिस्थानच्या पर्वतमय भागातून कायमस्वरूपी माघार घ्यावी लागली.

इराक-इराण संघर्षात सद्दाम हुसैन सारखा भस्मासुर निर्माण करण्याचे महत्पाप अमेरिकेने केले, तर भारताच्या तटस्थ भूमिकेला शह देण्यासाठी पाकीस्थानच्या माध्यमातून ‘काश्मीरमध्ये’ अस्थिरता निर्माण करण्यास मदत केली. इस्त्रायलच्या भूमिकेचे समर्थन करताना फिलीस्तीनचे वैर अमेरिकेने ओढवून घेतले. तेलाच्या खाणींवर नियंत्रण मिळविण्यासाठी, अरब राष्ट्रांच्या अंतर्गत बाबींमध्ये अनावश्यक ढवळाढवळ करून अस्थिरतेचे वातावरण निर्माण करण्यास सुरु केले. तेलाच्या खाणी हातात घेण्यासाठी अख्खा इराण तसेच अफगाणिस्थान भाजून काढला आणि आता लिबिया भाजून काढत आहे. अशा गुंतागुंतीच्या राजकीय व आर्थिक हस्तक्षेपामुळे अमेरिका विरोधी वातावरण बनत गेले, त्याला थंड करण्यासाठी कुटनीतिक हत्यारे वापरून प्रसंगी दहशतवादाला मदतही केली. आर्थिक केन्द्रीकरणाच्या स्पर्धेत दहशतवादाला मदत करून विघातक शक्तींचे ‘जागतिक संघटन’ वाढविण्यास अमेरिकेनेच अप्रत्यक्ष मदत केली.अल-कायदा, जैश-ए-मोहम्मद, हरकत-अल-अन्सार, हम्मास, आय.अस.आय. हरकत-अल-मुजाहिदीन, लष्कर-ए-जब्बर, लष्कर-ए-तोयबा, सीमी, हिजबुल मुजाहिदीन, इस्लामिक लिबरेशन फ्रंट आदी दहशतवादी संघटनाचे जाळे जगभर पसरले आहे.

जागतिक दहशतवादाचे स्वरूप :-                

सत्ता आणि आर्थिक स्पर्धेत आपले प्राबल्य जपण्यासाठी अमेरिकेने, रशियाच्या अफगाणिस्थान वरील १९७९ च्या आक्रमणाला शह देण्याचा चंगच बांधला. तालिबानी मुजाहिदीन जेहादिंना पाकच्या मध्यमातून मदत करण्यास सुरुवात केली. ‘मुस्लीम ब्रदरहूड’ ची संकल्पना उचलून धरणाऱ्या अबदुल्ला आजमच्या सहकाऱ्यांना अमेरिकेने शस्त्रास्त्रे पुरविली. १९५० मध्ये जन्मलेल्या मुहम्मद बिन लादेनच्या, ‘ओसामा बिन लादेन’ नाव असलेल्या ५० व्या पुत्राने दहशतवादी कारवायांना मूर्त रूप देण्यास सुरुवात केली. ओसामा बिन लादेनचा उपयोगही अमेरिकेने करून घेतला. रशियन फौजांना शह देण्यासाठी अमेरिकेने १९८६ मध्ये तालिबानच्या खोस्त भागातील पर्वतमय परिसरात ‘डिफेन्स टनेल्स’ (संरक्षक खंदक) बांधून दिलेत. यामुळे दहशतवादाच्या जागतिक प्रशिक्षणाला तसेच कारवायांना सरंक्षण मिळाले, आणि १९९८ मध्ये रशियन फौजांना अफगाणीस्थानातून माघार घ्यावी लागली.

इराक-इराण संघर्षात सद्दाम हुसैनला निर्माण करून अमेरिकेने अरब राष्ट्रांमध्ये विषयुक्त वातावरण बनविले आणि आपले इप्सित साध्य केले. परंतु फिलीस्तीन-इस्रायल संघर्षाच्या वेळी इस्रायल आणि मिस्त्र यांच्यात मैत्री झाली. याच वेळी इस्रायलची बाजू उचलून फिलीस्तीनच्या  मनात राग निर्माण केला, यामुळे फिलीस्तीन च्या ‘हम्मास’या संघटने अमेरिका विरोधी पवित्रा घेतला.

संपूर्ण इस्लामी राष्ट्रांनी वेढलेल्या इस्रायलच्या ‘मोसाद’ गुप्तचर संघटनेचे कार्य पाहून अमेरिका प्रभावित झाली व इस्रायलला झुकते माप देऊ लागली. त्यामुळे इस्लामी राष्ट्रांत असंतोष पसरला. मुळात अमेरिका इसाई राष्ट्र, त्याकारणाने इस्लामविरोधी भूमिका घेणे स्वाभाविक होते. धार्मिक प्रेम यामुळे अमेरिका आणि मुस्लीम ब्रदरहूड यांच्यात वातावरण तापत गेले. इस्लामच्या प्रसाराला  इसाईकारणाने पायबंद घातल्याने त्यांच्या भावना अधिकच तीव्र  बनत गेल्यात. हे वातावरण थंड करण्यासाठी आशियायी देशांच्या अंतर्गत संबंधात तेल ओतण्यास सुरु केले.

जन्मजात हाडवैर असलेल्या भारत-पाक संबधातील दुरावा वाढावा आणि ह्या विकसनशील देशांची बाजारपेठ कायमची मिळविता यावी म्हणून लुडबुड सुरु केली. पाकला शस्त्रास्त्रे आणि पैशाचा पुरवठा केला जाऊ लागला. भारतात कितीतरी आत्मघातकी हल्ले झाले तरी, लोकशाहीचा आव आणणाऱ्या अमेरिकेला  त्याचे काहीही वाटले नाही. काश्मीर विधान भवनावरील हल्ला, १३ डिसेंबरचा भारतीय संसदेवरचा हल्ला ह्याचेही अमेरिकेला काहीही वाटत नाही.   परंतु ११ सप्टेंबर रोजी ‘अमेरिकन वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागान’ वरील हल्ल्याने अमेरिका खडबडून जागी झाली. भारतातील राज्यकर्त्यांची  हिटलिस्ट बनविली जाते, भारताच्या सार्वभौमत्वावर आक्रमण केले जाते, मुंबईत २६/११ चा हल्ला केला जातो ह्या सर्व गोष्टी आंतरराष्ट्रीय दहशतवादाशी संबधित आहेत.

“बांधोनिया शीला पोहू जातां सिंधू,
पावे मतीमंदू मृत्यू शीघ्र ||”

उपरोक्त संत ज्ञानेश्वराच्या पंक्तीनुसार , दहशतवादाचा धोंडा पाठीवर घेऊन जागतिक अर्थकारणाचा सप्तसिंधू पोहून जाण्याचे मतीमंद कृत्य अमेरिका करत आहे,हीच कृती अमेरिकेचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी संपूर्ण जगाला दहशतवादाच्या विळख्यात जखडून ठेवले आहे. अमेरिकेच्या सार्वभौमत्वावर जेव्हा घणाघाती हल्ला झाला, तेव्हा त्या देशाला खडबडून जग आली.आता मात्र दहशतवाद संपविण्याची भाषा बोलली जात आहे.

आंतरराष्ट्रीय  दहशतवाद आणि भारत :-

आतापर्यंत भारताचे अनेक तुकडे पाडण्यात परकीय सत्ता यशस्वी झाल्यात. पाकीस्थान, बांगलादेश, नेपाळ तसेच अफगाणिस्थान हा भाग भारतातूनच तोडल्या गेला हे इतिहासावरून सहज लक्षात येईल. अफगाणिस्थानातील ‘हिंदुकृश’ पर्वतरांगांच्या नावावरून सहज लक्षात येईल. भारतातील प्रादेशिक कलह आणि दहशतवादी कारवाया ह्याचाच भाग आहेत. पंजाबात अतिरेकी कारवायांना पायबंद बसत नाही तोच काश्मीर प्रश्न अधिकच भडकविण्यात येत आहे. पूर्वोत्तर राज्यांमध्ये अलगाववादी   कारवायांना अधिकच उत येत आहे. आत्मघाती हल्ल्यांच्या माध्यमातून शेकडो निरपराध लोकांचा बळी घेतला जात आहे. नक्षलवादी  कारवायांना प्रोत्साहित करून भारतीय बांधवांच्या हातूनच भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहिले जात आहेत. भ्रष्ट्राचाराने अख्खा देश पोखरून काढण्यास सुरुवात केली, दररोज एकतरी भ्रष्ट्राचाराचे प्रकरण उघडकीस येत आहे. काश्मिरात दहशत माजविणाऱ्या पन्नास पेक्षा जास्त संघटना देशविघातक कृत्य करत आहेत. अल-कायदा सोबत संबंध असलेल्या ‘सिमी’ सारख्या संघटनांची  देशविघातक कामे सर्व परिचित आहेत. लादेनसारख्या अतिरेक्याचे मुल्ला-मौलाविकडून समर्थन केले जाते,ह्या सर्व घटना आंतरराष्ट्रीय दहशतवादाशी संबंधित आहेत.

मुंबई स्फोटातील दाउद इब्राहीमला पाकमधील कराचीत आलिशान बंगल्यात राहण्याचे भाग्य लाभते, मुंबई हल्ल्यातील मुख्य आरोपी कसाब याचे कबुलीजबाब व पुरावे असूनही त्याच्या पाकी सूत्रधारांवर आंतरराष्ट्रीय कार्यवाही होत नाही. पश्चिमबंगाल मध्ये लादेनचा विरोध करणाऱ्या बालकाला बदडून काढले जाते अशा एक ना अनेक घटना दहशतवादाशी संबधित आहेत. या सर्व बाबी भारताने जगासमोर वारंवार मांडल्यात. पण प्रत्यक्ष झळ पोहोचल्यावरच इतर देशांना जाग येत आहे. उपरोक्त विवेचनावरून भारतातील दहशतवाद आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा अविभाज्य घटक आहे, ह्याला संपण्याशिवाय पर्यायच नाही. सुज्ञ आणि जाणकार युवकांनी पुढाकार घेणे क्रमप्राप्त आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जोपासला गेलेला दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय दहशतवाद ठरतो, त्याला संपविण्याचे जागतिक प्रयत्न हे आता परमेश्वरीय कार्य ठरते.

काही धार्मिक मुल्ला-मौलवी व धर्मगुरूंच्या आदेशान्वये धर्मांतरासाठी युवकांना भडकविले जाते. इतर धर्माच्या विरोधात अपप्रचार केला जातो. वास्तवात नसलेले ‘जन्नत’ च्या स्वप्नाचे आभास निर्माण केले जावून युवकांना त्यांच्या योग्य मार्गापासून भरकटविले जाते. धार्मिक संघर्षातून युद्धजन्य परिस्थिती उदभवते व संधीसाधू लोकांना याचा फायदा घेणे सहज शक्य होते. निरपराध लोकांचे शिरकाण करून आपले वर्चस्व निर्माण करणाऱ्या दृष्ट लोकांना धडा शिकविणे आवश्यक आहे. भारतीय विचार पद्धतीतील  सर्व उपासना व  धर्म समुदायांचा खालील मतप्रणालीवर  विश्वास आहे –

” आकाशात्पतितं तोयं |
यथा गच्छति सागरम  ||
सर्व देवः नमस्कारः |
केशवं  प्रति गच्छति  || ”

” सर्व उपासना पद्धती एकाच नियंत्या परमेश्वराकडे पोहचतात, त्यामुळे कोणालाही धर्मांतराची गरज नाही !” असे स्वामी विवेकानंदानी जागतिक धर्मपरिषदेत संपूर्ण जगाला सांगितले. परंतु युवकांच्या भावना चेतवीत इस्लामी मुल्ला-मौलवी प्रक्षोभक आणि अंतिम टोकाची विधाने करतात. तसेच धर्मग्रंथांचा आधार घेऊन अविवेकी वर्णने केली जातात. दहशतवादाला अल्लाचे कार्य संबोधून, जेहादच्या नावाखाली समस्त इस्लामी समुदायाला भरकटवून घातपात घडविले जातात. या भ्रमिष्ट करणाऱ्या गोष्टींना भारतीय मुस्लीम युवकांनी विरोध करून कुटील कारस्थाने हाणून पडली पाहिजेत. आज कोणालाही जाती धर्माच्या नावावर लढणे आवडणार नाही. सामाजिक तेढ वाढविणाऱ्या गोष्टींचे, भारतीय मुस्लीम समाज कधीही समर्थन करीत नाही, हे वारंवार सिद्ध होत आहे.

नवोन्मेषाच्या उमेदीने समाजप्रवाहात सामील होऊन तथाकथित मौलवींच्या परंपरांना हाणून पडण्याची वेळ आता आली आहे.आजच्या विज्ञानयुगात शेकडो आव्हाने समोर ठाकली आहेत, वाढती लोकसंख्या, शिक्षणातील मागासलेपणा, स्त्रियांवरील अत्याचार ह्या यक्षप्रश्नांकडे मुस्लीम युवकांनी लक्ष घालणे आवश्यक आहे. धार्मिक उन्माद पसरविणाऱ्या असामाजिक तत्वांना तिलांजली देणे आवश्यक आहे. धर्माच्या नावावर आरोळी ठोकून अवास्तव भाष्य करणाऱ्या लोकांची मक्तेदारी आता हाणून  पाडणे आवश्यक आहे.

अमेरिकेवरील ११ सप्टेंबर च्या हल्ल्यांमागे अनेक कारणे होती, अमेरिकेने भारताला मदत करण्याचे जाहीर करताच काश्मीर चे विधान भवन उडवून देण्याचे प्रयत्न केले गेले. याकडे  दुर्लक्ष करता येणार नाही. अमेरिकेने नाठाळ कृत्य करून अनेक शत्रू निर्माण केलेत, अमेरिकेचे हितशत्रू त्याच्या  मित्रांवरही आघात करू पाहत आहेत. अमेरिकेच्या शत्रूंच्या विचाराची दिशा बदलली, आणि त्या विचारांनी  आज दहशतवादाचे रूप धारण केले. ह्या दहशतवाद्यांना संपूर्ण जग काबीज करण्याची स्वप्ने पडू लागलीत, त्यामुळे युवकांनी आता जागरूक होणे आवश्यक झाले आहे. एकंदर दहशतवाद समस्त मानवजातीचा शत्रू आहे, यामुळे संभाव्य धोक्यांची जाणीव ठेवून प्रतिकारासाठी सज्ज असले पाहिजे. नुसते सज्ज असण्यापेक्षा देशासाठी प्राणार्पणही करण्याची मानसिकता ठेवली पाहिजे.

” भले तरी देऊ कासेची लंगोटी
नाठाळांचे माथां हाणू काठी   | ”

या उक्तीप्रमाणे सामाजिक अशांतता पसरविणाऱ्या समाजविघातक तत्वांना निखंदून तसेच ठेचून काढले पाहिजे.  स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर म्हणतात,”जे राष्ट्र आपला भूतकाळ विसरून वर्तमान काळात जगते त्या राष्ट्राचा भविष्यकाळ अंधकारमय असतो.” यासाठी आम्हाला आमच्या इतिहासातील घटनांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. युवक हे राष्ट्राचे प्राण आहेत, प्राणवायूचा काम युवक करतात म्हणून प्राणवायू अकार्यक्षम होता कामा नये. यासाठी ‘समग्र सावरकर’ साहित्यातील, ‘सहा सोनेरी पाने,’ ‘मोपल्यांचे बंड,’ ‘माझी जन्मठेप,’ ‘काळे पाणी,’ ‘हिंदुपदपातशाही.’ आदी पुस्तकांचे अध्ययन केले तरी परिस्थितीची  कल्पना येणे शक्य आहे.

जागतिक दहशतवादाचा सगळ्यात मोठा हादरा भारताला बसलेला आहे, यामुळे भारतीय युवकांची भूमिका दहशतवादाला समूळ नष्ट करण्याची असली पाहिजे. आमच्या देशात येऊन घातपाती कृत्य करणाऱ्या अतिरेकी व त्यांच्या सीमेपार बसलेल्या आकांना त्यांच्या घरात जाऊन  धडा शिकविण्यास सज्ज असले पाहिजे. घटनेतील कलम ३७० मुळे काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग धोक्यात आलेला आहे, आणि त्याचा प्रत्यय आम्हाला ‘कारगील वरील आक्रमणाच्या’ वेळी आला.

भारतात घातपाती कृत्य करण्यासाठी जागतिक अतिरेकी संघटना युवकांना प्रशिक्षण देतात, मग भारताच्या सरंक्षणासाठी भारतीय सेनेने भारतीय युवकांना शस्त्र प्रशिक्षण का देऊ नये ? शस्त्र प्रशिक्षणाने सज्ज युवक आपत्कालीन स्थितीत स्वातंत्र्यसेनानी प्रमाणे देशासाठी कामी येतील !

जागतिक दहशतवादाचे स्वरूप लक्षात घेता, आता जागतिक स्तरावर स्वाभिमानी युवकांना शस्त्र प्रशिक्षण देऊन दहशतवादाला तोंड देण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. अन्यथा हा दहशतवादाचा भस्मासुर जग पोखरून काढल्याशिवाय राहणार नाही. दहशतवादाचा लढा सभ्य आणि सुसंस्कृत समाजाच्या विरोधात आहे. निरपराध समाजावर अन्याय, अत्याचार करणाऱ्या दहशतवादी कारवायांना शमविण्यासाठी युवकांनी समोर यायला पाहिजे, यासोबतच राजकीय हेतूने प्रेरित व अतिरेकी कामांना मदत तसेच समर्थन करणाऱ्या राजकारण्यांनाही धडा शिकविणे आवश्यक आहे.

” दिधले दुःख पराने, उसने फेडू नयेची सोसावे ?
देव करील शासन तयाला म्हणोनी उगेची बैसावे ?”

असे आमच्या संत महंतांनी प्रतिकाराचे तत्व सांगितले आहे, अत्याचार करणाराचे उसने ‘जशास तसे आणि ठोशास ठोसा’ या न्यायाने परत करण्याचा उपदेश केला आहे. त्यामुळे अतिरेकी निर्माण करणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीचा वेळीच बिमोड करणे अपरिहार्य आहे. अत्याचाराला सडेतोड उत्तर दिल्याशिवाय पर्याय नाही. दहशतवाद हा धर्मांधतेतून उदयास आलेला आहे, त्यामुळे संपूर्ण जगाला तत्वज्ञान सांगणारा स्वामी विवेकानंद अवतरणे आवश्यक आहे, ही क्षमता भारतीय युवकांमध्ये आहे.

सगळे धर्म मनुष्याला मोक्ष मिळवून देण्याचे आमिष दाखवितात. स्वामी विवेकानंद म्हणतात कि,”रोटी हीच खरी परमेश्वरीय शक्ती होय, या जन्मात मनुष्याला रोटी मिळवून देण्यापेक्षा मोक्ष मिळवून देण्याचे आमिष दाखविणारा ईश्वर मला अजिबात मान्य नाही !”  असे उदात्त तत्वज्ञान जगाला सांगणाऱ्या विवेकानंदाचा युवकांनी वसा  घेणे आवश्यक आहे. शिकागोच्या जागतिक धर्मपरिषदेच्या व्यासपीठावरून, जगाला जीवनाचे खरे तत्वज्ञान सांगणाऱ्या ‘योध्दा संन्याशाचे’ कार्य विसरून, आजचा युवक वैयक्तिक सुखाच्या लालसेपायी देशभक्ती विसरत चालला आहे. या प्रकारामुळे राष्ट्रविघातक तत्वे जोपासली जात आहेत, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवकांनी त्यागाची भूमिका स्वीकारणे आवश्यक आहे. परदेशात देशभक्तीबाबत बोलणे प्रतिष्ठेचे समजले जाते पण आमच्या देशात मात्र याउलट वातावरण बनविले जात आहे.

” छायामनस्थ कुर्वान्ति  तिळन्ति स्वयमातपे |
   फलाव्यपि परार्थाय वृक्ष सत्पुरूषा इव ||”

या संस्कृत सुभाषितानुसार वृक्ष उन ,वारा, पाऊस यांची तमा न बाळगता इतरांना फळे,सावली, काष्ट इत्यादी निस्वार्थपणे  देत असतात. तसे युवकांनी त्यागमय जीवन जागून राष्ट्राच्या जीवनात प्राणवायू ओतला पाहिजे. समाजविघातक  शक्तींना  शक्ती,युक्ती तसेच बुद्धीने शह दिला पाहिजे.

” हिरा ठेविता ऐरणी | वाचे मारिता घणि  |
तोची मोल पावे खरा | करणीचा होय चुरा  ||

संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे कि, खऱ्या हिऱ्याला  घणाच्याही घावाने इजा होत नाही. त्याचे योग्य मोलच लक्षात येते, अपकृत्य मात्र नाश पावते. त्यामुळे दहशतवादाला संपविण्यासाठी प्राणापलीकडेही प्रयत्न करावे लागतील. त्यानंतरच या देशाच्या भविष्याचा उदय होईल, अन्यथा देशाचा आणि जगाचाही नाश  ओढवल्याशिवाय राहणार नाही.

काश्मिरातील मुस्लीम महिलांनी बुरखे घालावे, अन्यथा त्यांच्यावर  एसिड फेकून विद्रूप केले जाईल, असे आतंकवादी संघटना फतवे जाहीर करतात. तसेच हिंदू महिलांनी कुंकू लावावे असे बजाविले जाते. यात कोणताही धार्मिक संबंध नाही, हिंदू मुस्लीम ओळख करून निरपराधांचे शिरकाण करून जातीय सलोखा बिघडविण्याचे हे तंत्र  आहे. भारतात देशांतर्गत यादवी माजविण्यासाठी आंतरराष्ट्रीय आतंकवाद्दांनी चालविलेले कटकारस्थान आहे. हिंदूचे रक्त सांडून हिंदूंना भडकविणे तसेच मुस्लिमांचे रक्त सांडून मुस्लिमांना भडकविणे सोपे जावे.

भडकलेल्या आगीने राष्ट्रीय सलोखा बिघडावा असे परकीय शक्ती नेहमीच प्रयत्न करणार. म्हणून कोणत्याही गोष्टीचे समर्थन करतांना युवकांनी तसेच राजकीय पुढाऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. देशभक्ती आणि देशद्रोह ह्या परस्पर विरोधी विचारसरणी आहेत. देशभक्तीला देशद्रोह्यांच्या रांगेत उभे केले जाणार नाही काळजी आपण घेतली पहिजे.

दहा वर्षा अगोदर ‘कामन वेल्थ आफ इन्डीपेंडंट स्टेटस ‘ च्या  महासचिवांनी सांगितले होते कि,”१२ ते ५० वयोगटातील जवळपास पन्नास हजार जिहादी आत्मघातकी सैन्य उभे केलेले आहेत.” तसेच रायफलधारी इस्लामी महिलांचे दस्ते तुर्कस्थानला तयार केल्याचे वृत्त वारंवार छायाचित्रांसह वृत्तपत्रांतून वाचायला मिळत आहे. ह्या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

आतंकवादी संघटना महिला तसेच युवकांच्या भावना भडकावून आपले इप्सित साध्य करू इच्छितात, त्यांच्या दृष्ट योजना सफल होणार नाहीत आणि सामान्य समाज भरडला जाणार नाही याची काळजी घेणे युवकांचे काम आहे. आज इस्लाम इस्लामेत्तर संघर्ष निर्माण करण्याचे कशोशीने प्रयत्न केले जात आहेत.

आजपर्यंत भारताने वारंवार दहशतवादाचे विकारल स्वरूप जगापुढे मांडले, परंतु प्रत्यक्ष झळ पोहचेपर्यंत अमेरिकाही जागी झाली नाही, किवा ‘कळते पण वळत नाही’ या म्हणीप्रमाणे आर्थिक सत्तेच्या लालसेपायी जाणीवपूर्वक डोळेझाक करत आली. प्रसंगी आमच्या शेजारी राष्ट्राच्या दहशतवादी कृत्यांकडेही  दुर्लक्ष केले.

दहशतवादाच्या लढ्यात आम्ही जगासोबत आहोतच परंतु आमच्या अंतर्गत बाबींमध्ये अमेरिकेतर्फे  लुडबुड करण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. ह्या प्रयत्नांना भारतीय युवकांनी हाणून पाडणे आवश्यक आहे. आमच्या राष्ट्रीय हिताच्या विरोधी असणाऱ्या अमेरिकेच्या कोणत्याही धोरणाचे आम्ही समर्थन करता कामा नये. इतरांचा जगण्याचा अधिकार नाकारणाऱ्या दहशतवाद्दांना एकदा कायमस्वरूपी धडा शिकविला जाणे अपरिहार्य आहे. अमेरिका नेहमीच दुटप्पी वागते, या दहशतवादाच्या लढ्यात संशयास्पद भूमिका दिसल्यास प्रसंगी भारतीयांनी अमेरिकेलाही धडा शिकविणे आवश्यक आहे. आमची राष्ट्रीय अखंडता आणि एकत्मता जपली जाईल याची काळजी घेणे ही आम्हा सर्व भारतीयांची जबाबदारी आहे.

— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश

नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
About नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश 78 Articles
व्यवसायाने शिक्षक असलेल्या श्री नरेंद्र लोहबरे यांना विविध विषयांवर लेख तसेच कविता लिहिणे फार आवडते. देशविदेशातील प्राचीन तथा अर्वाचीन नाणे व चलनाचा संग्रह करण्याचा त्यांना छंद आहे. पर्यटन, पक्षी निरीक्षण, छायाचित्रण, रक्तदान करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आदी बाबींचेही छंद आहेत. आयुर्वेदिक वनस्पतींचे जतन करणे आवडीचा विषय आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..