जागतिक व्याघ्र दिन हा दरवर्षी २९ जुलैला साजरा केला जातो. हा दिवस खास , जगभरातील वाघांचे संगोपन आणि संरक्षण व्हावे तसेच ह्यांची कमी झालेली संख्या वाढावी ह्या हेतूने साजरा केला जातो. हा दिवस पहिले साजरा केला गेला सेंट पिटर्सबर्ग (रशियातील एक शहर) येथे आणि वर्ष होते २०१०. वाघाच्या नैसर्गिक निवासस्थानाचे संरक्षण करणे , जागतिक जागरूकता वाढविणे आणि व्याघ्र संवर्धनाच्या प्रश्नांना पाठबळ देणे हे ह्या दिवसाचे उद्दिष्ट आहे.
भारतात १९७३ साली ‘ प्रोजेक्ट टायगर ‘ सुरू झाले होते. त्यावेळी ९ व्याघ्रप्रकल्प होते आजमितीला ५० व्याघ्रप्रकल्प आहेत.
महाराष्ट्रात बोर , मेळघाट , नवेगाव – नागझिरा , पेंच , सह्याद्री आणि ताडोबा या सहा व्याघ्र प्रकल्पांमध्ये ३१२ वाघ असल्याचे नवीन गणनेनुसार सांगण्यात आले आहे.
– आदित्य दि. संभूस
संदर्भ – माहितीजाल
फोटो सौजन्य – गूगल
Leave a Reply