३१ मार्च हा आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी ओळख दिन म्हणून जगभर पाळला जातो.
पूर्वी हे तृतीयपंथीय शुभशकुनी समजले जात. ते श्रीमंतही असत. राजेरजवाड्यांकडे ते मोठे पद मिळवून असत. काही मुस्लिम राजवटींमध्ये लहानपणीच काही मुलांना मुद्दाम पौरुषत्वापासून दूर करून पुढे मोठे झाल्यावर स्त्रियांच्या महाली संरक्षक म्हणून नेमण्याची विचित्र प्रथाही होती. असेही समजले जाते की तृतीयपंथीयांच्या शरीरात अधिक ताकद असते, हा फक्त समज असावा. त्यांचा आशीर्वाद शुभ मानणारे अजूनही खूपजण आहेत.
तृतीय पंथी व्यक्तींना सुप्रीम कोर्टाने ‘तिसरे’ लिंग म्हणून २०१४ मध्ये मान्यता दिली. त्या मुळे त्यांना शिक्षण, नोकरी इत्यादी ठिकाणी आरक्षणही मिळेल व अधिक महत्त्वाचे व आनंदाचे हे की त्यांना आपले लिंग स्त्री वा पुरूष असे लिहिणे बंधनकारण रहाणार नसून ‘इतर’/’तृतीयलिंगी’ व्यक्ती म्हणून कायदेशीर रित्या वैध मार्गाने जीवन जगता येऊ लागले. या निमित्ताने महाराष्ट्र सरकार तर्फे तृतीय पंथी ओळख सप्ताह पाळला जातो.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply