आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंच डिकी बर्ड यांचा जन्म १९ एप्रिल १९३३ रोजी बार्नस्ली, इंग्लंड येथे झाला.
क्रिकेटमधील पहिले आणि कदाचित एकमेव सुपरस्टार पंच हेरल्ड डेनिश बर्ड उर्फ डिकी बर्ड हे त्यांची खास हॅट, उभे राहण्याची विशिष्ट छबी आणि विनोदबुद्धी, त्याचबरोबर अचूक निकाल देण्याची क्षमता या गुणांमुळे ते क्रिकेटपटू आणि प्रेक्षकांमध्ये सारखेच लोकप्रिय होते. जगातील ऑल टाईम ग्रेट अंपायर म्हणून त्यांची ओळख होती.
सुरवातीला ते फुटबाँल खेळत असत, दुखापतीमुळे फुटबाँल खेळणे सोडून दिले. आणि आपला मोर्चा क्रिकेटकडे वळवला. डिकी बर्ड उजव्या हाताने गोलंदाजी करत असत. ते राईट आर्म ऑफ ब्रेक गोलंदाज होते. १९५६-५९ यॉर्कशायर कडून ते पहिला प्रथम श्रेणीचा सामना खेळले. १२ ऑगस्ट १९६४ रोजी अखेरचा प्रथम श्रेणी सामना खेळले.
१९७० मध्ये अंपायर म्हणून त्यांनी आपले करिअर सुरु केले. डिकी बर्ड हे क्रिकेटचा एवढ्या वर्षांचा काळ बघितलेला एकमेव जिवंत माणूस असावेत.
https://www.youtube.com/watch?v=bEMr8QaLLCQ
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply