नवीन लेखन...

इंटरव्हेन्शनल रेडिऑलॉजी

काही भयानक रोगांमध्ये ऑपरेशन ऐनवेळेला टाळून किंवा ऑपरेशन करताना होणारा रक्तस्त्राव कमी करुन अथवा कॅन्सर हाताबाहेर गेल्यावर भयंकर त्रास टाळण्यासाठी क्ष किरण शास्त्र रुग्णाच्या मदतीसाठी धावून आले आहे व याचे तज्ञ खास प्रशिक्षण घेतलेले ब्लॅक कॅट कमांडोसारखे कलाबाज असतात. नाकात होणारी एक गाठ ज्यामध्ये सर्जन ऑपरेशनमध्ये होणार्‍या रक्तस्त्रावाला खूप घाबरतात. अशी गाठ क्ष-किरण तज्ञ (इंटरव्हेन्शनॅलिस्ट) त्या गाठीला पुरवठा करणारी धमनी स्क्रिनिंग (टी.व्ही.) वर बघून आधीच ब्लॉक करतात.२००cc पेक्षा जास्त रक्त खोकल्याच्या ऊबळेत पडत असेल तर पुन्हा, त्या फुफ्फुसाच्या रोगाला रक्तपुरवठा करणार्‍या धमनीचाच रक्तपुरवठा करणार्‍या धमनीचाच रक्तपुरवठा करणार्‍या धमनीचाच रक्त पुरवठा साफ बंद करुन टाकतात ! जे कॅन्सर ऑपरेशनमध्ये खूप रक्तस्त्राव देतात त्यांचीही हीच गत आधीच करुन टाकली जाते व सर्जरी सुखरुप होते. लहान वयात होणार्‍या रक्तदाबाच्या त्रासाला जबाबदार असलेली अरुंद झालेली मुत्रपिंडाची धमनी रेडिऑलॉजिस्ट आतमध्ये स्टेंट टाकून रुंद करतात व रक्तदाब रोग पूर्ण बरा करतात. पोटातील स्वादुग्रंथीजवळील ट्युमरने झालेली कावीळ खूप वाढली असेल तर यकृतातील छोट्या पित्तनलिकेच्या आत सूई घालून पित्त वाहून नेतात व कावीळ कमी करतात व पुढे नळी ट्युमर जवळ नेतनेत स्टेंट टाकून पित्त वाहण्यास कायमचा चांगला रस्ता बनवतात. अशा प्रकारे काविळीमध्ये मृत्यु होण्याचे टळते.सोनोग्राफीच्या मदतीने छातीतील व पोटातील पाणी काढणे किंवा यकृतामधील पू काढून टाकणे हे आज सोपे झाले आहे. फुगलेल्या किडणीमध्ये सुई घालून दाब कमी करणेही शक्य झाले आहे.सी.टी. स्कॅनमुळे फुफ्फुसात अगदी महत्वाच्या रक्तवाहिन्
ांजवळ असलेले रोग बायॉप् सी करुन नक्की कसले आहेत हे कळू शकते. अशा रोगात अचूकतेने सूई घालावी लागते. नाहीतर रक्तवाहिनी फुटून रुग्ण दगावू शकतो व हे सी.टी. स्कॅनमुळे सहज शक्य होते. अशा प्रकारे क्ष-किरण शास्त्र

अनेक ट्रीटमेंटसमध्ये उपकारक सिद्ध झाले आहे.

— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे

डॉ. श्रीकांत राजे
About डॉ. श्रीकांत राजे 21 Articles
ठाणे येथील सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट. एक्स-रे आणि सिटी स्कॅन या विषयांतील तज्ज्ञ. मेडिव्हिजन या डायग्नॉस्टिक्स सेंटरचे संचालक. “मेडिकल इमेजिंग” या क्ष किरण व मॉडर्न इमेजिंग विषयांवरील पहिल्या मराठी पुस्तकाचे लेखक. सर्वसाधारण माणसाला या विषयावरील महत्वाची माहिती थोडक्यात मिळण्यासाठी या पुस्तकाचा मोठा उपयोग झाला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..