नमस्कार
” चंदर ” – या बाल-कादंबरीचे प्रकाशन शिक्षक दिनी – ०५- सप्टेंबर -१९९७ ला परभणीच्या नूतन विद्यालयात झाले .
मी बालसाहित्य लेखन सुरु केले १९९३ साली , बागुलबुवा आणि स्वावलंबन ” ही दोन गोष्टींची पुस्तके प्रकाशित
झाली . मुलांसाठी किशोर कादंबरी लिहिणे ” हे माझे लेखन स्वप्न ..१९९७ साली पूर्ण झाले ..
जेष्ठ साहित्यीक श्री.बाबा भांड
सर यांच्या प्रोत्साहना मुळे ” चंदर ” ही किशोर कादंबरी लिहून झाली आणि भांडसरांच्या “साकेत प्रकाशन -औरंगाबाद “या नामवंत प्रकाशन संस्थेने माझी ही किशोर कादंबरी प्रकाशित केली .
एक ध्येयनिष्ठ गुरुजी आणि त्यांचा ध्येयवेडा विद्यार्थी ” यांच्या भावूक गुरु-शिष्य नात्याची कथा “म्हणजे “चंदर” हे या किशोर कादंबरीचे कथानक आहे.
आता मी पुण्यात आहे , पुण्यात माझ्या सोबत असलेले बडोदा अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष – प्रसिध्द साहित्यिक व निवृत्त सनदी अधिकारी -श्री.लक्ष्मीकांतजी देशमुख हे १९९७ साली परभणीला निवासी -उप-जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते .मीही या काळात परभणीला होतो .त्याकाळातील आमची मैत्री आजही तशीच आहे .
त्या सहवासाची आठवण ..”चंदर” किशोर कादंबरीच्या निमित्ताने नेहमीच होते ..
– श्री.लक्ष्मीकांत देशमुख यांनी “चंदर “या किशोर कादंबरीला दिलेल्या शुभेच्छा कादंबरीच्या मलपृष्ठावर आहेत.
त्या अशा …
“ही कथा आहे एका अभ्यासू व संस्कारक्षम मुलाच्या धडपडीची . जिद्दीची आणि परिश्रमपूर्वक यश मिळवणाऱ्या बालकाची . एका छोटया गावाच्या विकासासाठी धडपडणाऱ्या गुरुजींची . ज्यांनी नवी पिढी घडविण्याचा वसा घेतला आहे.
आज समाजात विद्यार्थी जो उद्याचं भविष्य आहे – संस्कारहीन होत चालला आहे. त्याच्यापुढे चंगळवादाचे आदर्श आहेत- खूप पैसा कमावणे व मजा करणे , ” अशावेळी सामाजिक बांधिलकी मानणारे व त्यासाठी जीवन वेचणारे शिक्षक व सहजतेने ते संस्कार ग्रहण करून एक उत्तम विद्यार्थी व एक आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न करणारा विद्यार्थी या कादंबरीद्वारे श्री.अरुण वि.देशपांडे यांनी संस्कारक्षम वयातील किशोर- युवा वाचकापुढे सादरकेले आहेत . त्यातील आदर्शवाद साधा सोपा , कसलीही आडवळणे नसलेल्या कथानकात सहजतेने येणारे मौलिक व जीवनोपयोगी विचार हे या कादंबरीचे मर्मस्थान आहे.
किशोर- युवा वाचकांना ही कादंबरीका वाचतांना त्यांच्यातल्याच एका धडपडणाऱ्या मुलाचं चित्रण असल्याचं आढळून येईल ,ते या कथानकाशी समरस होतील असा विस्वास वाटतो.
अतिशय सुबोध व रंजक कथनशैली . कथानायक चंदरने शिक्षण घेण्यासाठी उपसलेल्या धडपडीचे नेटक्या भाषेत आलेलं चरित्र – चित्रण व गुरुजींच्या रुपानं साकारलेला आदर्शवाद, यामुळे ही कादंबरी खर्या अर्थानं संस्कारक्षम झाली आहे.
करी जो रंजन मुलांचे |जडेल नाते प्रभुशी त्याचे |
ही उक्ती सार्थ करणारी आहे.
लक्ष्मीकांत देशमुख
(परभणी- १९९७ )
ही बालकुमार कादंबरी आपल्यासाठी – क्रमशः आरंभ करतो आहे, त्यासाठी शुभेच्छा व प्रतिसाद द्यावा ही विनंती.
— अरुण वि.देशपांडे
9850177342