जीवनात जेंव्हा जेंव्हा
पहुडावं विश्रांतीसाठी
एकांती मिटावेत डोळे.
आणि तूच दिसावीस
सतत हेच घडते आहे
प्रितीची ओढ अनावर
ओठात दडलेले सत्य
हेच मात्र खरं
तू जरी आज दूरदूर
तरी तुझा स्पर्शभास
मनांतरी मुक्तमुग्ध भेट
सारी निर्मलतेची साक्ष
हीच सत्यप्रितीची ओढ
अनाहत ध्यास, भास
भावनांचाच कल्लोळ
हेच मात्र खरं
जर भाग्यात असते
सत्यस्पर्शाचे वरदान
ललाटी नसता दुरावा
जरी कुठेही असतो तरी
सदैव एकरूप असतो
सर्वत्र ईश्वरीय सत्ता
त्यालाच स्मरत रहावे
हेच मात्र खरं
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. ७६.
१० – ३ – २०२२.
Leave a Reply