आता स्वत:च्या लेखनासाठीही संगणकाचा किंवा आयपॅड, आयफोन किंवा तत्सम सुविधांचा वापर करावा लागतो. संगणकावर किंवा त्या त्या अुपकरणांवर जे फॉन्टस् बसविलेले असतात, त्यानुसारच लेखन करावं लागतं. त्यामुळे शुध्दलेखनाचे बाबतीत बर्याच तडजोडी करणं अपरिहार्य असतं. फॉन्टसाठी लागणारं सॉफ्टवेअर घडविणारे तज्ज्ञ आर्थिक गणितही मांडतात. जे खपतं, विकलं जातं किंवा ज्याला जास्त मागणी असतं, असंच सॉफ्टवेअर बाजारात येतं. शुध्द अशुध्द असं ते जाणीत नाहीत किंवा या बाबतीत त्यांचं फारसं देणंघेणं नसतं.
त्यामुळं संगणकीय लेखनात काही गैरसोयी झाल्या आहेत त्याबरोबरच काही सोयीही झाल्या आहेत. ‘रवी’ आणि ‘खी’ हे निराळे ओळखता येतात. वानखेडे हे वानरवेडे असं वाचलं जात नाही. पद्धत किंवा शुद्ध या शब्दात, अुच्चारानुसार ‘द’ अर्धा आणि ‘ध’ पूर्ण असायला हवा पण तो तसा टाअीप करायला गेलात तर तो…पद्धत किंवा शुद्ध असाच टाअीप केला जातो. लिहीतांनाही आपण पद्धत आणि शुद्ध असंच लिहीतो. ‘ध’ हलंत (अर्धा) आणि ‘द’ पूर्ण असं टाअीप केलं तर कसं टाअीप केलं जातं ते पहा….पध्दत, शुध्द..
विश्व या शब्दात ‘श्’ चं रूप बदलून ते अुलट्या ४ सारखं होतं तर ‘व’ अर्धा होतो. काही संगणकात ‘श’ अर्धा होतो (अुलटा ४ होत नाही) आणि ‘व’ पूर्ण राहतो.
शुध्द कशाला म्हणावं आणि अशुध्द कशाला म्हणावं हेही काही वेळा समजत नाही. ‘होतं’ हे शुध्द तर ‘व्हतं’ हे अशुध्द..पण ‘नहोतं’ हे अशुध्द तर ‘नव्हतं’ हे मात्र शुध्द…हे कसं?
टाअीप केलेला हा मजकूर, माझ्या संगणकात असलेल्या सॉफ्टवेअरनुसार टाअीप झाला आहे. आता मराठी भाषेची आणि लिपीची शुध्दाशुध्दता, अक्षररूप (फॉन्ट) तज्ज्ञ आणि मराठी सॉफ्टवेअर घडविणारे तज्ज्ञ यांच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. टाअीप केलेल्या मजकूराचा आशय समजला म्हणजे फॉन्ट सॉफ्टवेअर यशस्वी झालं असं मानावं.
अक्षररूप, फॉन्ट तज्ज्ञांना काही सूचना कराव्याशा वाटतात. मागील लेखांत …. मी सुचविलेले … शिफारस केलेले स्वर :: अ ची बाराखडी :: अ अॅ आ ऑ अि अी अु अू अे अै ओ औ
यापैकी अ आ ओ औ या स्वरांना स्वतंत्र कळा आहेत. इ ई उ ऊ ए ऐ या पारंपारिक स्वरांनाही स्वतंत्र कळा आहेत. या ६ कळांना अि अी अु अू अे अै या कळा दिल्या तर इ ई उ ऊ ए ऐ हे स्वर गाळले जातील आणि त्यांच्या जागी अि अी अु अू अे अै हे स्वर सहज टाअीप करता येतील. अॅ ऑ हे स्वर दोन कळा वापरून सहज टाअीप करता येतात. ञ आणि ङ अैवजी दुसर्या कोणत्यातरी अक्षरांना किंवा अक्षरखुणांना या कळा द्याव्यात. ऋ ची स्वतंत्र कळ आहे, ती दुसर्या कोणत्यातरी अक्षराला द्यावी. ॐ ची कळ मात्र हवीच.
Leave a Reply