नवीन लेखन...

इतरांतील लाचारी बघे

शक्तीच्या जोरावरती,  बघतो इतरांत लाचारी

विसरून जातो वेड्या,  स्वत:तील न्यूनता खरी ….।।धृ।।

 

पैसे ओढती खोऱ्यानें,  परि शरीर भरले रोगानें

श्रीमंतीत वाढली कांहीं,  गरिबाची लाचारी पाही

विसरून देह दुर्बलता,  धनाचा अहंकार धरी…१

शक्तीच्या जोरवरती बघतो इतरांत लाचारी

 

शरीर संपदा मिळे,  परि अडते पैशामुळे

देहाचा ताठा फार, इतरां तुच्छ लेखणार

विवंचना ती पैशाची,  विसरे शरिर सौख्यापरि….२

शक्तीच्या जोरावरती बघतो इतरांत लाचारी

 

ज्ञानीजन ते असती,  अगाध त्यांची मति

टीका करित राहूनी,  विसरती ते अडचणी

परिस्थितीचे वलय,  निराश त्यांना करी….३

शक्तीच्या जोरावरती,  बघतो इतरांत लाचारी

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..