इथं आपल्याला आवडतं
ते लोकांना आवडेल असं नाही,
लाईकच गणित कळतं नाही इथं
तर कमेंट देणं फार दूरस्थ होई
कुणी कुणाला विरोध म्हणून
दुसऱ्याला लाईक कमेंट देतात,
कुणाचा राग ही न बोलता
मग इमोजीत व्यक्त करतात
कुणाचे किती कौतुक केले
तरी लोकं मागचं आठवतात,
एकाला कमी लेखण्यासाठी
दुसऱ्याचं वारेमाप कौतुक करतात
चांगलं लिहलं तुम्ही तरी
इथे आवडेल असे नसते,
कुणाला कसे हाणून ते
पाडायचे हे मात्र असते
लाईक आणि कमेंटची गणित
कुठल्या शाळेत शिकवत नसतात,
कोणाला किती मागे ओढायचं
हे पाठ फुकटात दिसतं असतात
गंमत आहे सगळी ही
रसिकहो सांगते स्वाती आता
तुम्ही आणि मी पण आहे यात
कोण न सुटला ह्या देखाव्यात
म्हणूनच म्हणते सोडा हा
लाईक कमेंटचा मोठा फ़ंडा,
माझ्या ह्या कवितेला मिळतो
का पाहते मला लाईकचा अंगठा
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply