#LetsThink #AllLivesMatter
जर इथं गोऱ्यांचं आयुष्य महत्व राखतं…
तर इथं काळ्या लोकांचं जीवन सुद्धा महत्व राखतं..
जर इथं धार्मिक लोकांची श्रद्धा महत्व राखते…
तर इथं निधर्मीयांचा विश्वास महत्त्व राखतो…
जर इथं श्रीमंतांचा गौरव महत्त्व राखतो…
तर इथं गरिबांचा स्वाभिमान सुद्धा महत्व राखतो…
जर इथं नास्तिकांचा विचार महत्त्व राखतो…
तर इथं अस्तिकांचा देव सुद्धा महत्त्व राखतो…
जर इथं माणसांचा आवाज महत्त्व राखतो…
तर इथं प्राण्यांच्या वेदनाही महत्त्व राखतात…
जर इथं माणूस असण्याचा गुरुर महत्त्व राखतो..
तर मानवी अस्तिव संपण्याची भीती सुद्धा महत्त्व राखते…
इथं स्त्रियांचं स्वातंत्र्य, बालकांचं भविष्य, वृद्धांचा मान, तरुणांच्या डोळ्यातील स्वप्न, धनाड्याचा बंगला तर गरिबांची झोपडी देखील खूप महत्व राखते…
इथं ऊन वारा पाऊस माती नाती गोती नर नारी सूर असुर सर्व सर्व महत्त्व राखतं…
तसंच इथं किड्या मुंग्या जीव जंतू या सर्वांचं योगदान महत्व राखतं…
ही धरा कुणाच्याही ‘बापाची जहागीर’ नाही…
म्हणून इथं अमानवीयतेचा अंत महत्त्व राखतो…
तर माणुसकीचा ‘नव्याने जन्म’ सुद्धा अधिक महत्त्व राखतो…
© अनिलराव जगन्नाथ
Leave a Reply