अपेक्षा न ठेवता फळाची कर्म करत रहायचे असे ऐकले आहे. पण सामान्य माणूस संतवृत्तीचा नसतो. फार फार नाही पण किमान जाणिव ठेवली तरी खूप आहे. मी सुद्धा एक सामान्य माणूस आहे. आणि अशा वेळी मला शांत बसवत नाही. शाळेत असताना रोज आम्ही भेटलो की एक शिक्षिका स्मित हास्य करत वर्गावर जायच्या. एकदा त्या वरच्या मजल्यावर वर्गावर जात असताना मी तिथेच होते. पण त्या सरळ निघून गेल्या. मात्र मला वाईट वाटले. आज त्या अशा कशा गेल्या न हसता. चैन पडली नाही. मधलीसुट्टीत विचारले की माझे काही चुकले का? त्या म्हणाल्या नाही हो बाई वरच्या वर्गातील मुले जरा वेगळी आहेत. मी जाई पर्यंत नको असलेले भांडण होतात म्हणून मी घाईघाईत गेले. माझच चुकले. मी मु. अ. इथेच नव्हे तर मंडईतील भाजी विकणारी. दूध आणणारा. भांडी घासणाऱ्या अशा अनेक ठिकाणी घडल्या होत्या. याचे कारण म्हणजे माझा स्वभाव आणि सवय झाली होती एकमेकांना. पण पुढे पुढे मात्र याची सवय होऊनही माझ्यात बदल केला नाही मी….
साधारण पणे बारा वर्षे झाली असतील एका नातेवाईकांनी माझ्या बाबतीत जे केलं होतं त्यातून मी शिकायला हवे होते. परत तोच अनुभव आला या आठपंधरा दिवसात पणजी झाले होते. खूप दिवसाचे चांगले सबंध आहेत पण आम्ही दोघेही जात नाहीत कुठल्याही कार्यक्रमात. आणि बारसे तर थाटामाटात मोठ्या प्रमाणावर. त्यामुळे वाटल की लोक येतात. जेवण करून अगदी सोन्या चांदीचे दागिने देतात. आणि मी निदान कल्पना करुन आपण खूश राहू शकतो. शिवाय बाजारात सगळे काही विकत मिळते. मात्र मायेची ऊब आणि आशीर्वाद मिळत नाहीत. त्यामुळे मी याच नात्याने एक आशीर्वाद देत असल्याची छोटीशी कविता आणि माझ्या साड्यांची घोधडी पाठवली. त्यामुळे सहाजिकच अपेक्षा होती की खूप छान आहेत दोन्ही गोष्टी. गोधडी बाजारात मिळते. पण मायेची ऊब नसते आणि आशीर्वाद तर कुठेच कितीही किंमत मोजली तरी नाहीच मिळत याची तरी जाणिव .आणि आशीर्वाद फारच मोलाचे असतात ते मिळाले. फक्त एवढेच जरी म्हटले असते तर मी भरुन पावले असते. पण नाही . विरस झाला होता. हॉटेल मध्ये पाणी चहा दिला की लगेच वेटरला थॅंक्स म्हणणारी ही पिढी आपल्याला काहीही म्हणत नाही. याचे वाईट वाटले. कोणतीही वस्तू देताना कृष्णार्पण असे म्हणतात ते बरोबर आहे देवाला अर्पण करून अपेक्षा ठेवू नये. हेच खरं आहे आणि तसेही मी बाळकृष्णालाच दिले होते ना एक गोष्ट नक्की आपलेपणा. माया. प्रेम या दिल्यान वाढतात नाही तर बूमरँग सारखे आपल्या वरच उलटून येतात. काय शिकायचे पुढील पिढीने. बघा आले ना मी मूळ पदावर तुम्ही काय प्रतिक्रिया देणार याची वाट पहात आहे.
–सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply