अगदी समाजाच्या तळागाळापर्यंतच्या प्रेक्षकांना आपलासा वाटेल अशा हुकमी मसालेदार मनोरंजक चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक, कथाकार आणि नायक महेश कोठारे याच्या ‘झपाटलेला ‘ ( रिलीज १४ एप्रिल १९९३) या यशस्वी चित्रपटाच्या प्रदर्शनास २८ सत्तावीस वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांचा उत्तमरितीने करुन घेतलेला मनोरंजक वापर हे आहे.
तात्या विंचू ही व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय झाली. या चित्रपटात महेश कोठारेसह लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर, मधु कांबिकर, किशोरी अंबिये, पूजा पवार, विजय चव्हाण, रवींद्र बेर्डे, राघवेन्द्र कडकोळ, दिनकर इनामदार, बिपीन वर्टी, जयप्रकाश परुळेकर, जयराम कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
जेनमा फिल्म्स इंटरनॅशनलच्या या चित्रपटाची पटकथा महेश कोठारे आणि अशोक पाटोळे यांची आहे. संवाद अशोक पाटोळे, छायाचित्रण सूर्यकांत लवंदे, गीते प्रवीण दवणे तर संगीत अनिल मोहिले यांचे आहे.
हा चित्रपट हिंदीत ‘खिलौना बन गया खलनायक ‘, तर गुजरातीत ‘झडती लिधो ‘ या नावाने निर्माण झाला.
— डॅशिंग ग्लॅमरस.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply