आफ्रिकन काव्यात स्थित्यंतरे चालूच आहेत. हल्लीची गीते, कथानके-कथाकथने, नृत्ये या माध्यमांतून हा बदल दिसून येतो. त्यातच आता नव्या विद्युत् माध्यमांचा प्रभावही पडत आहे. यात गेल्या दहा पंधरा वर्षातील उभरते व विश्र्वव्यापक ‘इंटरनेट’च्या माध्यमात प्रसिध्द होणाऱ्या साहित्याचा या क्रांतीमध्ये सिंहाचा वाटा आहे. ‘वोल सोयिंका’ हे नायजेरियन कवी. बरीच वर्षे त्यांना देशाबाहेर राहावे लागले. स्वातंत्र्यासाठी व लोककल्याणासाठी झगडण्यात त्यांनी जीवन व्यतीत केले. १९८६ साली त्यांना नोबेल पारितोषक मिळाले. म्हणजे ते नायजेरियाचे ‘रविंद्रनाथ’ आहेत. आईवरची आफ्रिकन कविता वात्सल्यरसाने ओथंबली आहे. पण आफ्रिकन कवितेच्या आढाव्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे, की मराठी व आफ्रिकन माणसाची काव्यावरची माया व जातकूळ सारखीच आहे.
– अरुण मोकाशी
परिवहन तज्ज्ञ अरुण मोकाशी यांच्या झांझिबार डायरी या इ-पुस्तकातील लेखाचा हा अंश.
हा संपूर्ण लेख तसेच त्यांचे या पुस्तकातील सर्व २५ लेख वाचण्यासाठी हे पुस्तक खरेदी करा.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://marathibooks.com/books/zanzibar-diary/
किंमत : रु.२००/
सवलत किंमत : रु.५०/-
Leave a Reply