लाट उसळतां ती क्रोधाची, बळी घेतले कित्येकाचे
हिंसाचाराच्या लाटेमध्यें, सर्वस्व गमविले कांहींचे…१,
फार पूरातन काळीं आम्हीं, चालत होतो एक दिशेनें
कुणीतरी फोडून वाटा तेव्हां, विखरूनी टाकिली कांहीं मने…२,
त्याच क्षणाला बिज रूजले, धर्मामधल्या विषमतेचे
ईश्वराकडे त्या जाण्याकरितां, मार्ग पडती विविधतेचे….३,
विविधतेनें संघर्ष आणिला, भेदभावाची भिंत उभारूनी
विवेकाला गाडून टाकले, उफाळणाऱ्या भावनांनी,
चूक कुणाची सजा कुणाला, कालचक्राची रीत न्यारी
धर्म पंथांचे मार्ग आखूनी, सलोख्यात निर्मिली एक दरी
कमी न होईल अंतर हे, केवळ दुजा धर्म जाणतां
एकत्र येवूं तेव्हांच सारे, ईश्वरास तो एक समजतां
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply