नवीन लेखन...

जबाबदारीच्या हजार वाटा..

जबाबदारी म्हणजे आपण स्वत:हून स्वीकारलेली एक भूमिका असते, जी सांगते की, तुमच्या कृतीतून घडणाऱ्या आणि घडवण्याच्या परिणामांचं तुम्ही स्वत: कारण आहात. आज वयाच्या तिसाव्या वर्षी आयुष्याच्या मध्यावर आल्या सारख वाटत राहत. मागे बघितले तर बालपण, तरुणपण व पुढे बघितलं तर दिसतंय असंख्य जबाबदाऱ्यांचे मोठं ओझं..! जबाबदाऱ्या ह्या वयाचा प्रत्येक वळणावर असतात बालपणी व्यवस्थित चांगले संस्कार, शिक्षण घेण्याची जबाबदारी आपल्यावर असते.  पुढे जसजसे आपण मोठे होत जातो तसेच घेतलेल्या शिक्षणाचा योग्य वापर करून उपजिविकेचे साधन निर्माण करणे, मग तो व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल यांचा शोध घेणे ही पुढची जबाबदारी आपल्यावर येऊन पडते.  एकदा ती जबाबदारी पार पडली की सर्वांना वाटायला लागते “अरे वा..! हा तर छान पैकी सेट झाला आहे, आता लग्न करा आणि सेटल व्हा.” परंतु वयाच्या या टप्प्यावर योग्य वेळी योग्य निर्णय घेणे, आपली आर्थिक बाजू तपासणे व ती अधिक सक्षम केल्यानंतरच पुढील आव्हानांचा विचार करणे या जबाबदाऱ्या आपण सपशेल  विसरून जातो. आपण वयाच्या त्या टप्प्यात वहावत जातो, आपल्याला वाटतं की आज आपल्याला नोकरी आहे किंवा आपला चांगला व्यवसाय आहे म्हणजे आपल्या जबाबदाऱ्या संपल्या पुढचं सर्व यावर भागून जाईल, परंतु लग्न होते लग्न झाल्यानंतर एक व्यक्ती आपल्या आयुष्यात येते जी की कायमची आपलं घर,आपले पालक सोडून आपल्या आयुष्यात येते, तिची मोठी जबाबदारी ही आपल्याला वयाच्या पंचविशी- तिशीमध्ये पार पाडावी लागते.  जिथे कुठे आपण आत्ताशी स्वतःला सावरु शकत होतो त्याच टप्प्यांमध्ये आयुष्यात एक व्यक्ती येते व ती पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असते ह्या जबाबदारीची जाणीव होत असतानाच, आपण आपल्या आपत्यना जन्म देतो,  जन्म दिल्यानंतर काही वर्षे पुन्हा आनंदात जातात.  बाबा झाल्याचा आई झाल्याचा आनंद गगनात मावत नाही.  आपण आनंदाच्या भरात भान हरवून आयुष्याचा तो टप्पा  जगत असतो, परंतु पुन्हा त्याच दरम्यान अनाहूतपणे हजारो जबाबदाऱ्या आपल्याकडे तोंड आ करून बघत असतात.

या सर्व घटनाक्रम मध्ये आयुष्याच्या सुरुवातीच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पडल्यात किंवा पालकांनी त्या पार पाडून घेतल्या तर पुढच्या जबाबदाऱ्या पार पाडणे सुखकर किंवा सोयीचे जाते. अन्यथा आयुष्यात कमालीचा संघर्ष वाट्याला येतो आणि तो करत असताना आयुष्य जगायचे राहून गेले की काय? या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागते. दरम्यान याच संघर्षामध्ये कुटुंबाचे व अपत्यांचे देखील आयुष संघर्षमय करून ठेवतो.

समाजात वावरत असताना नेहमी म्हटल जात की, जसा पैशाकडे पैसा जातो आणि वाढतो, तशी जबाबदारी घेणाऱ्याकडे जबाबदारी जाते आणि वाढते. अशा वेळी तिचं ‘ओझं’ वाटतं. वेळप्रसंगी ‘एखादी जबाबदारी घेणं’ ही ‘क्रेडिटेबल गोष्ट’ वाटायला लागते, तर कधी ‘जबाबदारी घेण्याचं कौतुक होतं’ म्हणून जबाबदारी घ्यायला आवडते. एखाद्याला आपल्याकडून झालेल्या एखाद्या चुकीची जबाबदारी घेण्याची ‘लाज’ वाटते, तर कुणाला ‘कामाला इतकं वाहून घेऊन काय मिळणार आहे?’ असे सल्ले वारंवार मिळाल्यानं जास्त जबाबदारी घेणं चूक आहे की बरोबर, असा साशंक सूरही निर्माण होतो. खरतरं जबाबदारी कुणीही दुसऱ्यावर लादू शकत नाही. जबाबदारी हे एकवेळ पूर्णसत्य नसेल, पण ते तुम्ही स्वत: स्वत:साठी ठरवून निर्माण केलेलं, उभं राहण्याचं एक स्थान असतं.

श्री. राहुल अविनाश कळंके
वैजापूर जि.औरंगाबाद

Avatar
About राहुल अविनाश कळंके 2 Articles
मी गेल्या दहा वर्षांपासून नामांकित CBSE शाळेत शिक्षक आहे. मला सध्याच्या सामाजिक प्रश्नांवर माझी मते मांडायला आवडतात. मी विविध वृत्तपत्रांसाठी अनेक छोटे लेख लिहिले. माझे विचार मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा लेखनाचा हेतू आहे. मी एक शिक्षक म्हणून काम करत असल्यामुळे मला वेगवेगळ्या वयोगटातील लोक भेटतात, त्यामुळे मला समाजातील वर्तमान समस्यांवर प्रकाश टाकण्याची प्रेरणा मिळते.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..