सुप्रसिद्ध क्रिकेटपटू जॅक कॅलिस
जॅक कालीसचा जन्म १६ ऑक्टोबर १९७५ रोजी दक्षिण आफ्रिकेमधील केप टाऊन येथे झाला. जॅक कॅलिस याने शालेय जीवनापासूनच क्रिकेट खेळण्यास सुरवात केली. जुलै १९९३ मध्ये त्याला अंडर – १७ मधून खेळवले गेले ते स्कॉटलंडच्या अंडर -१९ च्या टीमविरुद्ध . वयाच्या १८ व्या वर्षी तो पहिला फर्स्ट क्लास क्रिकेट सामना खेळला तर वयाच्या १९ व्या वर्षी उन्हाळ्यामध्ये ‘ पार्कसाईड रोड ‘ मधून खेळून येताना त्याने ९८.८७ या सरासरीने ७९१ धावा १४ सामन्यांमध्ये केल्या .
जॅक कॅलिस त्याचा पहिला कसोटी सामना खेळला तो इंग्लंडविरुद्ध १४ डिसेंबर १९९५ रोजी . १९९८ ते २००२ या कालखंडमध्ये जॅक कॅलिस सर्वोत्कृष्ट ‘ ऑल राउंडर ‘ म्हणून ओळखला गेला. जॅक कॅलिस अजून खेळायचा बाकी आहे म्हटले की निर्णय कधीही फिरू शकतो हे त्याच्या विरुद्ध खेळणाऱ्या टीमला वाटत असे . कारण त्याच्यामध्ये प्रचंड एकाग्रता आणि डळमळीत न होणे हे दोन महत्वाचे गुण होते. ज्यांनी जॅक कॅलिसला खेळताना ‘ लाईव्ह ‘ स्क्रीनवर किंवा प्रत्यक्ष पाहिले आहे त्यांना माझे म्हणणे पटेल. जॅक कॅलिस टीम मध्ये असला की विजयाजवळ सहज जात येईल असे वाटत असे. तो १६६ कसोटी सामने खेळला त्यापैकी ८२ सामने जिंकले ४२ अनिर्णित राहिले आणि ४२ सामने दक्षिण आफ्रिका हरली म्हणजे १६६ सामने असताना फक्त ४२ सामने दक्षिण आफ्रिका हरली असेच म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे तो ३२५ एकदिवसीय सामने खेळला त्यापैकी २०८ सामने दक्षिण आफ्रिकेने जिकंले आणि १०२ सामने दक्षिण आफ्रिकेने हरले होते .
जॅक कॅलिस हा पहिला खेळाडू आहे ज्याने १०,००० धावा कसोटी सामन्यांमध्ये आणि १०,००० धावा एकदिवसीय सामन्यांमध्ये केल्या असून कसोटी क्रिकेटमध्ये २०० विकेट्स आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये २०० विकेट्स घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे त्याने ग्रॅमी स्मिथ बरोबर टी २० च्या सामन्यामध्ये पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली आहे. एक बाबतीत जॅक कॅलिस ची बरोबरी सर गारफिल्ड सोबर्स बरोबर करता येईल . सोबर्स यांनी ५८ च्या सरासरीने ८०३२ धावा केल्या आणि २३५ विकेट्स घेतल्या त्या ३४ च्या सरासरीने. तर जॅक कालीसची फलंदाजीची सरासरी होती ५७ तर गोलंदाजीची सरासरी होती ३३. २००८ साल हे त्याच्यासाठी फार महत्वाचे होते कारण शॉन पोलॉक निवृत्त झाला होता आणि जबाबदारी जॅक कॅलिसवर आली होती. सोबर्स हा स्फोटक आणि दणकेबाज खेळ करत असे तर जॅक कॅलिस हा ऑर्थडॉक्स खेळाडू होता. दोघांची दोन टोके होती असेच म्हणावे लागेल. कोलकत्याला त्याने खेळताना अनेकांचा दम काढला होता हे कुणीही विसरणार नाही . कॅलिसने १६६ कसोटी सामन्यांमध्ये १३,२८९ धावा केल्या त्या ५५.३७ या सरासरीने त्यामध्ये ४५ शतके आणि ५८ अर्धशतके होती. कसोटी सामन्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या होती २२४ . त्याचप्रमाणे त्याने कसोटी सामन्यांमध्ये ३२.६५ या सरासरीने २९२ विकेट्स घेतल्या तर एका इनिंगमध्ये ५४ धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या . त्याने कसोटी सामन्यामध्ये २०० झेलही घेतले. तर त्याने ३२८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ११,५७९ धावा केलेल्या त्या ४४.३६ या सरासरीने त्यामध्ये त्याची १७ शतके आणि ८६ अर्धशतके होती. एकदिवसीय सामन्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या होती १३९ तर त्याने एका इनिंगमध्ये ३० धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या तर १३१ झेलही पडले.
नीट पाहिले तर जॅक कॅलिस याची कसोटी क्रिकेट आणि फर्स्ट क्लास क्रिकेट यामधील फलंदाजीची सरासरी जवळजवळ सारखी आहे अर्थात हे फारच कमी जणांच्या बाबतीत घडते. त्याने २५७ फर्स्ट क्लास सामन्यामध्ये १९,६९५ धावा केल्या त्या ५४.१० या सरासरीने तर कसोटी सामन्यांमध्ये त्याने १३,२८९ धावा केल्या त्या ५५.३७ या सरासरीने. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने ६२ शतके आणि ९७ अर्धशतके केली त्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे २२४ . जॅक कॅलिसने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एका इनिंगमध्ये ५४ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या. त्याचप्रमाणे त्याने २६४ झेलही घेतले.
जॅक कॅलिसला एकदिवसीय सामन्यांमध्ये २४ वेळा ‘ मॅन ऑफ द मॅच ‘ मिळाले. आय. सी.सी. ने जॅक कॅलिसचा २००५ मध्ये ‘ प्लेअर ऑफ द इअर ‘ म्हणून त्याचा सन्मान केला होता. २००५ मध्ये २००८ मध्ये विझडेनने त्याला ‘ लिडिंग क्रिकेटियर इन द वर्ल्ड ‘ संबोधले होते.
जॅक कॅलिसची लहान बहीण जी त्याच्यापेक्षा १० वर्षाने लहान होती ती २००९ च्या आय. पी. एल . मध्ये ‘ चिअर गर्ल ‘ होती, त्यावेळी ती भारतात आली होती. निवृत्तीनंतर त्याने एक फाउंडेशनची आपल्या सहकार्यांसमवेत स्थापना केली आणि त्याच्या विभागातील मुलांना तो मदत करतो.
सतीश चाफेकर
Leave a Reply