मुलांचे मनोरंजन ज्या मंचावरून होते. त्या मंचावरून सादर होणाऱ्या सर्व कला कार्यक्रमांना बालरंगभूमी मध्ये स्थान आहे. जादूचे प्रयोग मुलांचे सर्वाधिक मनोरंजन करतात.
जादूचे प्रयोग कुठेही होतात.घरात, शाळेत,बर्थडे पार्टीत,छोट्या मोठ्या सर्व मंचावरून.अगदी रस्त्यावर जादूचे प्रयोग केले जातात,आणि या सर्व प्रयोगांना मिळणारा बाल प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघण्यासारखा असतो.
जादू ही एक कला आहे.
प्रत्येक जादू ही आभासी,खोटी,भ्रम निर्माण करणारी,नजरेला फसवणारी असली तरीही त्यामागे फसवणूक करण्याची कला असते.
अनेक जादुमागे विज्ञान असले,तरीही ती सादर करताना जादूगाराच्या अंगी कौशल्य असणे आवश्यक असते. जादूगाराला उत्तम अभिनय करता येणे आवश्यक आहे.सर्व लोकप्रिय आणि सफल जादूगार हे उत्तम अभिनेते असतात.
अद्भुतता,चमत्कार.यांचे माणसाला सदैव आकर्षण असते.आश्चर्य चकित होणे.प्रत्येकाला आवडते. जादू.प्रेक्षकाला चकित करते. सामान्यपणे जी गोष्ट होऊच शकत नाही. घडू शकत नाही. जे असंभवनीय आहे. असे संभव करण्याची किमया जादू कलेत आहे.
अविश्वसनीय असे बघणे प्रेक्षकाला आवडते. जादुई कला मनोरंजक होण्यामागे हे एक कारण आहे. जादूगार,मुलांना प्रचंड आवडतो. कारण,तो मुलांना फसवतो.त्यांची फजिती करताना त्यांना हसावतो.आणि हसवता हसवता त्यांना जादुई खेळात सहज सामील करून घेतो. Birthday पार्टीत म्हणूनच जादूगारांना प्रचंड मागणी असते. मुले जादूगार भोवती लोह चुंबकाप्रमाणे गोळा होतात. त्याच्या जादूच्या प्रयोगात,जादुई खेळात, आनंदाने सामील होतात.
मुलांना जादू बघायला आवडते.तशीच ती करून बघायलाही आवडते.बहुतेक मुले जादूची साधने विकत घेऊन जादूगार होण्याचा अनुभव घेतात.यातूनच काही बाल जादूगार प्रसिद्धीस येतात.
जादू करायला,बघायला आवडत नाही.असे मुल कोणी कधी बघितले आहे का?
बालरंगभूमी म्हणजे बालकांचे मनोरंजन करणारी भूमी.बालकांचे रंजन करणारा मंच. नाटक खेळ मुलांना आवडतो,हे खरे.
पण नाटकापेक्षा मुलांना अधिक आकर्षित करणारा ,आवडणारा खेळ म्हणजे जादूचा खेळ. जादूचे प्रयोग,जादुई कला प्रांत. जादूचा समावेश म्हणूनच बालरंगभूमी चा विचार करताना प्राधान्याने करावा लागतो.
— राजू तुलालवार.
Leave a Reply