काळ येतां वृद्धपणाचा, विरक्तींची येई भावना ।
निरोप घेण्या जगताचा, तयार करीत असे मना ।।१।।
वेड्यापरी आकर्षण होते, सर्व जगातील वस्तूंवरी ।
नाशवंत त्या, माहित असूनी, प्रेम करितो जीवन भरी ।।२।।
जीवनांतील ढळत्या वेळीं, जेव्हां वळूनी बघतो मागें ।
मृगजळासाठीं धावत होतो, जाणून घेण्या सुखाची अंगे ।।३।।
प्रयत्न केले जरी बहूत, हातीं न लागे काहीं ।
पूर्ण कल्पना येई मनीं, जगण्यात आंता तथ्य नाहीं ।।४।।
उर्वरीत आयुष्याची रेखा, मर्यादेतच आखूनी काढी ।
समज येतां प्रभूचे सारे, समर्पण करीत जग सोडी ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bbknagapurkar@gmail.com
Leave a Reply