जगावे अगदी बिनधास्त,
निर्भय आणि निडर,
कशाला पर्वा कुणाची,
जगणे असावे कलंदर ,
असे जगावे जबरदस्त,
पत्थरांशी टक्करावे,
निधड्या छातीने अगदी,
संकटांना दूर सारावे,
मार्गी जेवढ्या अडचणी,
तेवढी घ्यावी आव्हाने ,
तू मोठा का मी म्हणत,
सरळ त्याच्याशी झुंजावे,
सामना करणे अटळ मग,
कशासाठी ते भ्यायचे,
सिंहाचे काळीज करून,
का नाही लढायाचे,—? आत्मविश्वासाने जग जिंका, भल्याभल्यांनी दाखवले, पळपुटेपणाने शेवट,
काय त्यातून मिळवणे, अडचणींच्या छातीवर,
पाय रोवून उभे रहाणे,
निराशा व्यथा सोडून,
ताठ कणा ठेवणे,–!!!
सुखे आणिक दु:खे ,
देहाच्या छाया पडछाया,
त्यांना प्रकाश देणे ,
खंबीर करून किमया,—!!!
निर्धास्त जगावे,
अचल रहावे,
स्वीकारुनी स्वाभाविक,
सदैव मार्ग क्रमावे,—!!!
— हिमगौरी कर्वे
Leave a Reply