त्यांचं वेड जगावेगळंच ,
अनाकलनीय आहे सगळंच.
विचार वेगळा वेगळंच जगणं,
कृतीत प्रत्यक्ष, न पोकळ बोलणं.
मुके प्राणी यांचे सोबती,
जगच यांचं त्यांच्या भोवती.
हृदयात माणुसकी मनात निष्ठा,
मुक्या जगाचा हा पाणवठा.
पुढचा मागचा न विचार मनात,
चमकण्याची न इच्छा जनात.
निगुतीने करत राहायचं काम ,
त्यांच्या कार्याला खरंच सलाम.
मुक्याना इथे मुक्त वावर,
अहो, वस्तीला होती, घरात –
जिवंत मगर.
पचनी पडेना जगण्याची theme,
सुन्न झाली Nervous system.
अशीही वेडी माणसं असतात ?
चेहऱ्याने आपल्यासारखीच –
दिसतात.
मी माझं, रमतो यातच आपण,
यांच्या विशाल कवेत –
संपून जातं मीपण,
आपण फक्त विनम्र व्हायचं,
जमल्यास काही शिकून घ्यायचं,
जमेल तेव्हा जमेल तसं –
पाणवठ्याला भेटून यायचं.
प्रासादिक म्हणे
–प्रसाद कुळकर्णी
Leave a Reply