हा न्याय आंधळा, ती प्रीत आंधळी
धन सत्य न्यायदा, धन सत्य प्रीती।।धृ।।
या युगी धनी ज्येष्ठ वडीलधारी
जगी गुणी,निर्धन कनिष्ठ होई
मंदिरात, धनिका दर्शन आधी
निर्धनास, दर्शनही दुर्लभ होई ।।१।।
कलियुगाची हीच रित असली
कुठली नाती अन कुठली प्रीती
कोण ते जन्मदाते, बंधुभगिनी
सखी, संतती कर्तव्याची नाती ।।२।।
जो तो हवा तसा धावत सुटला
विवेक सारा धनसंचयी गुंतला
प्रेमभाव सारे, मातीमोल झाले
भोगवाद, भोगूनी तोषली वृत्ती ।।३।।
दानपात्रे बेगड्या दातृत्वी भरली
कल्पना वृद्धाश्रमाचीच रुजली
प्रेम सोडुनी,सारेसारे इथे मिळते
मनुजा धनाने कबर तुझी खोदली ।।४।।
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. २६.
२६ – १ – २०२२.
Leave a Reply