आताशा मीच आजकाल
मनी मलाच उमगत राहतो
कसा, कुठे, कधी हरवलो
मीच मजला शोधित रहातो
हरविलेले क्षणक्षण जीवनाचे
पुन्हा पुन्हा आठवित राहतो
गतस्मृतींच्या लड़ीच रेशमी
अलवार मी उलगडित राहतो
सुखदुखांच्या साऱ्या संवेदनां
सदैव मीच कुरवाळीत राहतो
ज्या वात्सल्यप्रीतीत जगलो
त्या ऋणानुबंधा स्मरत राहतो
तो गतकाळ किती छान होता
लोचनातूनी, ओघळत राहतो
हे जगणेच, स्मरण गतस्मृतींचे
मीही फक्त, मुक्त जगत राहतो
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. १४०.
२३ – ५ – २०२२.
Leave a Reply