पंचतारांकित हॉटेल्सच्या बुफे मेनूपासून ते रिक्षाचा भोंपू एका हाताने वाजवत डोक्यावर इडलीचे भांडे व चटणी-सांबार घेऊन रस्त्याने फिरणाऱ्या फेरीवाल्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी इडली या पदार्थाची एक सवयच भारतीयांना लागली आहे.
इडलीचा जेव्हा विषय येतो तेव्हाअप्रत्यक्षपणे साऊथचे म्हणजे दक्षिण भारताचे नाव समोर येते. पण असे म्हणतात इडली इंडोनेशियातून भारतात आलेली आहे. इडलीला खूप जूना इतिहास आहे. पाक शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांच्या मते ८०० ते १२०० इ.पूर्वमध्ये भारतात इडली आली आहे. ‘इडली’ शब्दा ची निर्मिती ‘इडलीग’ यापासून झाली होती. याचा उल्लेख ‘कन्नड’ साहित्यात आढळतो.
जागतिक इडली दिवस मागच्याी चार वर्षापासून साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात ‘एम एनियावन’ यांनी केली. एम एनियावन हे ‘मल्लीपू इडली’चे संस्थाापक आहेत. थोरांपासून ते लहानांच्यापर्यंत इडली सर्वांसाठी सुरक्षीत खाद्य आहे. एनियावन यांच्यात मते, फादर डे, मदर डे असे डेस आपण साजरे करतो त्यााचप्रमाणे मला वाटले की, जागतिक इडली दिवस पण साजरा करायला हवा.
आता तर जगभरातील हॉटेल्समध्ये इडलीने मानाचे स्थान पटकावले आहे. देशात बंगळुरू शहर इडलीचा फडशा पाडण्यात आघाडीवर आहे. बंगलोर हे हिंदुस्थानातील इडली राजधानी आहे. सर्वाधिक इडलीच्या ऑर्डर याच शहरात दिल्या जातात. हैदराबाद आणि चेन्नईकर हे बंगलोरपाठोपाठ इडलीला सर्वाधिक पसंती देतात. मूळची दक्षिण भारतीय असली तरी पुण्यापासून गुरुग्रामपर्यंत आणि मुंबईपासून कोलकात्यापर्यंत इडलीने सर्वच खवय्यांच्या पोटात आणि जिभेवर आपले अधिराज्य अबाधित ठेवले आहे.
न्याहारीखेरीज रात्री उशिरा जेवणाऱ्या मध्येही इडली तितकीच लोकप्रिय आहे. स्विगी, झोमेटोवर ऑर्डर देणाऱ्यामध्ये ठरवून इडली मागवणाऱ यांची गर्दी असते.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply