त्वचेवरील पांढरे चट्टे अर्थात पांढरा कोड हा एक जनुकीय विकृतीतून होणार आजार असून, त्वचेचा रंग तयार करणाऱ्या पेशी नष्ट झाल्याने त्वचेवर पांढरे डाग उत्पन्न होतात. या आजारासंदर्भात असलेले भ्रम हे चुकीचे असून, योग्य उपचार केल्यास या आजारावर मात करता येऊ शकते.
जागतिक आरोग्य संघटनेने २५ जून हा दिन ‘व्हिटिलिगो’ अर्थात ‘जागतिक पांढरे कोड दिन’ घोषित केला आहे. कोड या आजाराबाबत समाजात जागृततेऐवजी गैरसमजच अधिक आहेत. कोड असणाऱ्या लोकांबाबत, या आजाराबाबत लोकांच्या मनात अनेक समज गैरसमज आहेत.
कोड या आजाराबाबत जागृकता निर्माण करण्यासाठी २५ जून हा दिवस जागतिक कोड दिन म्हणून साजरा केला जातो.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply