
जगात विकासाची गंगा आणली ती वाहतुकीच्या साधनांनी. म्हणून कोणत्याही अर्थव्यवस्थेचे वर्णन करताना अर्थचक्र हा शब्द वापरला जातो. चक्र है वाहतुकीचे आणि गतीचे प्रतीक होय. वाहतुकीच्या साधनांचा हा एक आढावा.
आंतरराष्ट्रीय व्यापारात क्रांती घडविली ती जलवाहतुकीने. जशी मोठी मालवाहू जहाजे निर्माण झाली तशी देशादेशांतील अंतरही कमी झाले.
सर्वांत मोठी जहाजे
जगातील सर्वांत मोठे जहाज म्हणून फ्रिडम ऑफ द सीज याचे नाव घेतले जाते. ३३९ मीटर लांब आणि ५६ मीटर रुंद असलेले हे जहाज २१.६ सागरी मैल गतीने धावते. यात ३६०० प्रवासी बसू शकतात. यापेक्षाही जेनेसीस क्लास हे जहाज मोठे असणार आहे. ते आता कोणत्याही क्षणी पाण्यात उतरेल. ३६० मीटर लांबीचे हे जहाज जगाला अर्पण करण्यासाठी या वर्षाचाच मुहूर्त आहे.
क्वीन मेरी -२ हे क्रमांक दोनचे मोठे जहाज ३४५.३ मीटर लांब आहे. द ग्रेट इस्टर्न हे जहाजही २१० मीटर लांब आहे. ज्याच्या बुडण्यावर ‘टायटॅनिक’ हा गाजलेला चित्रपट घेतला ते टायटॅनिकही महाकाय जहाजांपैकीच एक होते. त्याची लांबी २६९ मीटर होती. साधारणपणे जहाजाची भव्यता आणि मोठेपण त्याच्या वजनावरून ठरते. म्हणजे जहाजात प्रवासी सोडाच कर्मचारीही नसताना त्याचे हे वजन केले जाते. टायटॅनिक आणि लूसीतानिया ही दोन्ही जहाजे आपल्या प्रवाशांसह जलसमाधीस्त झाली.
Leave a Reply