नवीन लेखन...

जाहिरात : अंदर की बात

विरोधाभास,र्हा.स हा आजच्या समाजाचा स्थायीभाव आहे. आमच्या जाहिरातींतील समाज व वास्तवातील समाज यांत अंतर वाढत चालले आहे. “लिरील बाई”सारखं सगळ्यांनाच निसर्ग झर्यायखाली पळत थोडंच जाता येतं. दुसरीकडे पाण्यासाठी सायकलवरुन हंडे आणणार्यां ची रांग. सुंदरी गुटीने जाहिराती बाळसे धरीत आहेत. पिठापासून ते मिठापर्यंत “गिलापन” भुला देनेवाल्या जाहिराती. विश्वसुंदरीला ही वंडरविग्स् सगळ्या देशांत हिंडून न मिळता भारतातच मिळाल्या, वंडर आहे. जाहिरातीशिवायचा “केअर फ्री” समाज दुर्मिळच.

आपला व्यापार साकार करण्यासाठी त्याला आकार देण्यासाठी व्यभिचार रुजवत संस्कार मोडीत काढले आहेत. जाहिरातींचा रिमोट कंट्रोल अनावश्यक वस्तू खरेदीवर कंट्रोल करेनासा झाला आहे. जाहिरातीने निर्बंध तोडले. वैधानिक इशार्या ला बगलेत घेऊन ‘Made for each other’ म्हणत जाहिराती आपलं बस्तान बसवत आहेत. अनैतिक बाबींना जाहिरातीने घरात आणलेय. Bad for each other बाबी Good for each other भासविल्या जात आहेत. वैधानिक इशारा देऊन “शामची आई” जाऊन “हमारी प्यारी कॉम्प्लान ममी” मुलांसमोर आदर्श म्हणून बिंबवली जात आहे. “सच्चाई क्या होती है” चं उत्तर आईकडूनच “हमाम” साबण येत आहे. सच्चाई याने हमाम! “सच्चाई”साठीचे सर्व आदर्श साबणाप्रमाणे झिजले. साबणाच्या बुडबुड्याप्रमाणे क्षणिक आदर्श मुलांसमोर येत आहेत. “कम गले ज्यादा चले” संस्कृती येते आहे. साबणाच्या माध्यमातून जाहिरातीचा “फेस” करुन वैचारिक प्रदूषण घडवले जात आहे. साबणापेक्षा जाहिरातीचाच फेस जास्त केला जात आहे. नाही निर्मळ मन, काय करील साबण ही म्हणसुध्दा लोक विसरले की काय? मनाच्या सौदर्यापेक्षा नटीच्या सौंदर्याचे प्रमाण ठरवले जात आहे. सिनेतारकाचा साबण म्हणून तोच वापरायचा. साबणाचे रंग, सुवास, आकार बदलत आहेत. आई मुलीसाठी लाईफबॉय गोल्ड साबण आणते व मुलगी आईला “मम्मी यू आर जिनियस” म्हणते. जीनियस शब्द साबणाच्या किमतीएवढा स्वस्त केलाय. फक्त साडेसहा रुपये.

स्वाभिमान हा ज्याचा त्याचा प्रश्न. स्वाभिमानही स्वस्त झालाय. स्वाभिमान
isbroght to you by एक नाही अनेक प्रायोजक! उदंड झाल्या जाहिराती. त्यातून फार प्रचंड बाहेर येत आहे. जीवनाचा संदर्भ बदलणार्याउ जाहिराती. शरीराच्या पलीकडे जाहिराती सांगू इच्छित नाही तर दाखवू इच्छित आहेत. ज्या देशात अनेकांना पायातल्या वाहणा नाहीत, त्या देशात बाटासाठी शरीर उघडं टाकण्याचा बहाणा मधूमिलिद संस्कृतीत होत आहे. संस्कृती म्हणजे जीवन जगण्याची पध्दती, शरीराची भूमिती नव्हे. भोगसंस्कृतीचा अजगर विळखा घालत आहे. प्रतिष्ठेसाठी अनावश्यक वस्तू घरात यायला लागल्या. आचारसंहितेला छेदून जाहिराती मूल्यांना गुंडाळून ठेवत आहेत. नायक-नायिकेचा मृत्यू वृत्तपत्रात घडवून आणला जात आहे. मृत्यूचेही भांडवल करण्यापर्यंत मजल गेली आहे.

आपल्या पिताश्रींचे नाव अभिमानाने घेण्याचे दिवस संपलेत की काय? आजच्या I am a Complan Boy यात भूषण वाटत आहे. पालकांच्या संस्कारापेक्षा शरीराला आकार देणार्याp भौतिक वस्तू नैतिक बाबींपेक्षा महत्वपूर्ण ठरत आहेत. जात्यावरचे दळण गेले, ओव्या गेल्या. तयार आटा आला आहे. सोने जैसा गेंहूँ, दाना खनके! आजूबाजूला सोन्यासारखी माणसं असताना सोनं गव्हात पाहिले जाते.

शहरी लोकसंख्येच्या ३४ टक्के लोकांपर्यंत उपग्रहातर्फे प्रसारित होणारे कार्यक्रम पोहोचतात आणि वृत्तपत्रे ५८ टक्के लोकांपर्यंत वृत्तपत्रांतून सुध्दा काही जाहिराती फसवत आहेत. जाहिरात देऊन शिक्षक मिळेल, गुरु नाही. आज शिक्षकही मिळेल का? शिक्षकच मिळेल का? “पाहिजेत” या जाहिरातीतून अनेकांना नादी लावले जाते. पाहिजे असणारे आधीच ठरलेले असतात. काही ठिकाणी शाळांनासुध्दा जाहिरातीचा आश्रय घ्यावा लागत आहे. तज्ज्ञ शिक्षक, भव्य पटांगण, क्रीडांगण ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा हे जाहिरातीत सर्व असते. पण इमारतीत काहीच कधी कधी आढळत नाही.

जाहिराती सेन्सॉर व्हायची वेळ आली आहे. मूल्ये ढासळतील हे समजू शकते. पण त्यांचे सवंग प्रदर्शन प्रसारमाध्यमे जाहिरातींच्या माध्यमातून करीत आहेत. ज्यांच्या हातात सूत्रे आहेत तेच मूक साक्षीदार बनले आहेत ही समाजाती खरी शोकांतिका आहे.

भोगवादी संस्कृती प्लॅस्टिकच्या पिशवीत बंद होत आहे. जाहिरातीतून संस्कृती विकृती म्हणून प्रतिकृती स्वरुपात येत आहे. “जो जे वांछील ते तो लाहो” जाहिरातींमधून साकारले जात आहे. जाहिरातीतींल स्वप्नील आयुष्यावर जगणारा एक वर्ग तयार झाला आहे. संस्कृतीला फारकत देणारी जाहिरात समाजाचा आदर्श बनत आहे. संस्कृती केवळ गोडवे गाऊन चालणार नाही. संस्कृती वृत्तीत व कृतीत आणली पाहिजे.

जाहिरातींतून जे जे येत आहे ते समाजाचे मानस ठरत आहे. केवळ मालाचे खपच नव्हे तर राजकीय, सामाजिक आर्थिक चित्राला जाहिराती रंग देत आहेत. जाहिरातीतून नको ते बिंबवलं जातय, नको त्या वस्तूंचा संग्रह वाढीस लागत आहे. शेजार्याबकडे आहे मग आपल्याकडेही हवं ही वृत्ती वाढली. जास्त जाहिरात, मोठी जाहिरात, सातत्याने जाहिरात लोकांच्या मानसिकतेवर परिणाम करत आहे, खच्चीकरण करत आहे.

जाहिरातीला लोक फसत आहेत, जाहिरात करणारे कमवत आहेत, खरेदी करणारे पैसा, विवेक गमवत आहेत. जाहिराती शिवायचा समाज दुर्मिळ झाला आहे. विवेकसुध्दा जाहिरातीने विकत घेतलाय. जाहिरातीमुळे कोमात गेलेल्या समाजाला अस्तित्वासाठी भानावर यावे लागेल, नाही तर विनाश अटळ आहे.

– डॉ. अनिल कुलकर्णी
मोबा. नं. ९४०३८०५१५३
ई-मेल – anilkulkarni666@gmail.com
अे-१३, रोहन प्रार्थना, गांधी भवन, कोथरुड, पुणे ४११ ०३८.

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 36 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..