जाई जुईचं अलगद बहरण
की मंद निशिगंधाच दरवळण,
गुलाबाच टवटवीत होणं की
प्राजक्ताचं दवात ओलं भिजणं..
कमळाच पाण्यात भावणं
की मोगऱ्याच गंधित होणं,
जास्वंदीचं तरारुन उमलण
की झेंडूच भरभरुन डवरण..
तगरीच साधस दिसणं
की चाफ्याच गंध धुंद करणं,
शेवंतीच नाजूक ते फुलणं
की बकुळीच अबोल होणं..
रातराणीच धुंद आल्हाद होणं
की अबोलीच अबोल लाजण,
फ़ुलांचं हे मोहरुन बहरण
की माझं फुलांत मोहरण..
फ़ुलांचं हे गोड गंधित होणं
की माझं फुलांत नाजूक हरवणं,
फ़ुलांचं हे सुंदर अलवार हसणं
स्वातीचं मन फ़ुलांत गुंतून जाणं..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply