इये मराठीचिये नगरी । ब्रह्मविद्येचा सुकाळु करी । देणे-घेणे सुखचि वरी। होऊ देई या जगा।।
– संत ज्ञानेश्वर
मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्रधर्म वाढवावा
– समर्थ रामदास स्वामी
बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रीय आमुचा एक महाराष्ट्र देश हा
– श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
– गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी)
माझ्या मराठी मातीचा लावा कपाळास टिळा
तिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा
– कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर)
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा
– राजा बढे
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान
कोटी कोटी प्राणांत उसळतो एक तुझा अभिमान
– चकोर आजगावकर
भव्य हिमालय तुमचा अमचा, केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा
– वसंत बापट
असा काही आशीष द्या ह्या घडीला, महत्कारणी प्राण हा पाखडो
महाराष्ट्री जन्मास आल्याप्रमाणे, महादिव्य हातून काही घडो
– बा. भ. बोरकर
महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले
– सेनापती बापट
#जयमहाराष्ट्र
Leave a Reply