नवीन लेखन...

रुबाबदार नि भारदस्त अभिनेते जयराम हर्डीकर

जयराम हर्डीकर, मराठी नाट्यचित्रसृष्टीतील एक देखणे, रुबाबदार नि भारदस्त अभिनेते.

काही मराठी नाटकातुन नि चित्रपटातून जयराम यांनी उत्तम भुमिका साकारल्या होत्या. बँकेत नोकरी करता करता त्यांनी अभिनयाचीही आवड जोपासली. आंतरबँक एकांकीका स्पर्धांमधुनही त्यांनी अनेक वेळेस भाग घेतला होता. एकांकीका करत असताना व्यावसायिक नाटकांमध्ये त्यांचे पदार्पण झाले. आरोप, मंतरलेली चैत्रवेल इ. नाटकांमधुन त्यांनी भुमिका साकारल्या. सिंहासन, सर्वसाक्षी, २२ जुन १८९७ या चित्रपटांमधुन त्यांनी आपली भुमिका एकदम चोख पार पाडली.

सिंहासन या चित्रपटामध्ये अनेक दर्जेदार अभिनेत्यांच्या मांदियाळीत आपल्या कुटुंबावर प्रेम असलेला, त्यांच्या सुखासाठी धोक्याची नोकरी पत्करणारा आणि शेवटी राजकारणाच्या पटावर बळी जाणारा त्यांचा ‘पानिटकर’ लक्षात राहतो.

आवाजातील जरब, बोलके डोळे नि अंतर्मुख होणं, हे सारं काही छाप पाडुन जातं. २२ जुन १८९७ या चित्रपटामध्ये गणेश द्रविड ही एक नकारात्मक व्यक्तिरेखा त्यांनी साकारली होती. १९७८ सालच्या ‘सर्वसाक्षी’ या सत्य घटनेवर आधारित चित्रपटात एका शिक्षकाची मुख्य भुमिका त्यांनी साकारली होती, जो गावातील अंधश्रध्दा, बुवाबाजी, भगतगिरी यांचा आपल्या परीने विरोध करायचा प्रयत्न करतो. या चित्रपटातील ‘बंद ओठांनी निघाला’ हे गाणे माझ्या खुप आवडीचे आहे. हा चित्रपट hotstar वर उपलब्ध आहे.

त्यांचा अभिनय वाखाणला जाऊ लागला होता. कौतुक, प्रसिध्दी, यश या हे त्यांनी अनुभवायला सुरुवात केली होती. अशातच ‘मंतरलेली चैत्रवेल’ या नाटकाच्या दौऱ्याच्या वेळी ५ एप्रिल १९८० रोजी त्यांच्या बसला अपघात झाला नि त्यात जयराम हर्डीकर, ज्येष्ठ अभिनेत्री शांता जोग यांचा दुर्देवी मृत्यु झाला.

जयराम यांची पत्नी शांभवी हर्डीकर यांनी पतीच्या आठवणींवर एक पुस्तक लिहिले आहे, त्याचे नाव आहे ‘तुझ्याशीच बोलत्येय मी…’. २०१३ साली हे पुस्तक प्रकाशित झाले.

जयरामजींच्या काही आठवणी डायरी स्वरुपात त्यांनी या पुस्तकात लिहिल्या आहेत, यामधुन जयरामजींचे एक कुटुंबवत्सल रुप आपल्या सामोरे येते. जयरामजींच्या नंतर पदरातील दोन मुलींना त्यांनी स्वकर्तृत्वावर वाढविले. या काळात मनातुन त्या जयरामजींशी संवाद साधत राहिल्या, हा संवाद त्यांना कधी हळवा करी तर कधी त्यांचे मनोधैर्य वाढवी. हे प्रेमाचे अबोल पण डोळ्यात पाणी आणणारे रुप या पुस्तकातुन वाचकांच्या समोर येते. एकदा वाचावे असे हे पुस्तक.

‘बेधुंद मनाची लहर’, ‘आभाळमाया’, ‘या गोजिरवाण्या घरात’ या गाजलेल्या मालिकांसोबतच ‘सावरखेड एक गाव’ या सिनेमात अभिनय केलेल्या अभिनेत्री संज्योत हर्डीकर म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते जयराम हर्डीकर यांची मुलगी.

https://play.google.com/store/apps/detailsid=com.sachi.tujhyashich_boltyey_me

— मंगेश शशिकला पांडुरंग निमकर.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..