जैसे देणे तैसे घेणे
मग कसला विचार करणे
आधी कर्तव्ये पहाणे
जगण्यासाठी!!!
अर्थ–
आपण जे कर्म करतो, त्याची परतफेड याच जन्मात करावी लागते. म्हणून म्हटले जाते की जेवढे पाप करावे तेवढे मरण सोपे नाही.
पण येथे मात्र जैसे देणे तैसे घेणे याचा अर्थ माणसाच्या कर्माशी नसून निसर्ग आणि मनुष्य यांच्या देवाण घेवाणीशी आहे. या वर्षीच्या सुरुवातीला एका विषाणूच्या संसर्गामुळे अख्खे जग थांबले. तुम्ही मी सर्वजण काही काळासाठी खोळंबून जगलो, अजूनही जगतोय पण आता ते जगणे आतून दबून राहिलेल्या ज्वालामुखी सारखे जर उसळून बाहेर पडणार असेल तर त्याचा उद्रेक हा परत संकटाला आमंत्रण देणारा नसेल ना याचा विचार स्वतः करायला हवा. सोशल मीडियावर निसर्ग किती स्वच्छ झाला, याचे दाखले देणारे माहितीपर लेख, फोटो, व्हिडीओ खूप पाहिले गेले पण हाच स्वच्छ झालेला निसर्ग आपल्या अधीर जगण्याने परत काही काळात मलिन होऊन जाईल याची भीती ठेवूनच पाऊले टाकायला हवीत.
मग कसला विचार करणे, आधी कर्तव्ये पहाणे याचा अर्थ डोळेझाक करून वाट्टेल तसे वागणे नाही तर डोळे उघडे ठेवून निसर्गाला जाणून त्याची हानी होणार नाही याची काळजी घेणे असा आहे.
मी गेल्या 8 महिन्यात ट्रेकिंग ला जाऊ शकलो नाही या लोकडाऊन मुळे म्हणून आता मी अधाशा सारखा जर फिरू लागलो तर मला संसर्ग होणे जास्त शक्य आहे.
आणि म्हणूनच जगण्यासाठी म्हणजेच चांगले जगण्यासाठी विचार करून वागणे महत्वाचे आहे.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply