जखमी होऊन पिल्लू पडले, घायाळ, केविलवाणे,
करुण आवाजी साद घाले,
आईस बोलावे सारखे,
पक्षीण भोवती घिरट्या घाले, चोचीने त्यास गोंजारी,
कळेना तिला काय जाहले,
कसे पडले ते खाली ,–?
करूण साद ती ऐकून कोणी,
धावत आला दयावंत,
अती गरीब असूनही,
पक्षिणीस भासे देवदूत,
हळुवार हाते पिल्लाला,
जवळ घेऊन कुरवाळी,
साशंक मनाने पक्षीण मात्र,
सारखी हिंडे भोवताली,
नाजुकशा स्पर्शाने जाणवे,
इवल्या पिल्लाच्या शरीरी,
दिसे,– कांटा रुतलेला,
बघून कोवळ्या पिल्लाला,
त्यांतील होई देव जागा,–!!
पिल्लू सारखे वेदनेने,
तडफडून रडत असे,
पक्षीण घायाळ जखमेवाचून,
तो असहाय्य जीव असे,–!!!
प्राण तिच्या डोळ्यात सारे,
डोळ्यातूनच बोलत असे,
येई कींव दयावंता,
बाजूस करे तो काटा,
वर लावी औषध त्याला,
विचार केवढा मोठा,–!!!
घेऊन जाई घरी पिलास,
पक्षीण येत असे पाठी,
पिल्लू ठेवले कापसात,
उपचार करण्यासाठी,
पक्षीण येई रोज तेथे,
करत मुक्त संचार,–!!!
घास पिल्लाला भरवे ,
आता भरोसा तिला फार,
खूप काळ मध्ये जाई,
पिल्लू तिथल्या तिथे हिंडे,
आईस बघून तेवढे ,
उडण्यास सज्ज होई,–!!!
एक दिवस आला असा,
पिल्लू घरातल्या घरात उडे,
पक्षीण घेऊन जाई त्याला, मानवतेचे देणे केवढे,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply