नवीन लेखन...

जमिनीची धूप कशी होते?

माती वाहून लुप्त होते, त्याला आपण जमिनीची धूप झाली असे म्हणतो. धूप होत असलेली जमीन अनुत्पादक होत होत शेवटी वांझ बनते.

ज्या गतीने निसर्गात जमीन तयार होते. त्यापेक्षा ती खराब होण्याची गती जास्त होते तेव्हा त्या जमिनीवर अवलंबून असलेली जीवनसृष्टी धोक्यात येते.

सोसाट्याच्या वाऱ्याने मातीचे कण हवेत उडतात आणि विस्थापित होतात. वाळवंटाच्या कक्षा रुंदावणे हे हवेमुळे होणाऱ्या धुपीचे उदाहरण आहे. पाऊस आणि वाहते पाणी हे धुप घडविणारे महत्त्वाचे घटक आहेत. पावसाचे थेंब जमिनीवर सरळ खाली न पडता तिरकस पडतात, म्हणून त्यांची माती उकरण्याची क्षमता कैक पटीने वाढते. शेतीतील औजारे आणि हत्यारे तिरकस असतात. विळा, कुऱ्हाड, वखर, नांगर कोनात मारा करतात म्हणून ते अधिक प्रभावीपणे ठरतात. त्याचप्रमाणे तिरकस पर्जन्यधारा मातीचे कण एखाद्या शस्त्राने करावे तसे कण विलग करतात. जमिनीपासून सुटे झालेले कण पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पाण्याबरोबर (अपधाव) शेताबाहेर वाहून जातात.

सपाट जमिनीवरची पिठासारखी बारीक माती टनांनी वाहून गेली तरी तिचा दृश्य परिणाम जाणवत नाही. उताराच्या दिशेने वखरणी केलेल्या शेतावर पाऊस पडतो, तेव्हा पासेच्या रुंदीतले पाणी दोन बाजूंच्या चाकोऱ्यांतून वाहते. चाकोऱ्या रुंद आणि खोल होतात. कारण त्यांच्यातली बरीच माती वाहून गेलेली असते. सखोल भागातल्या चाकोऱ्यात सभोवतालचे पाणी जमून वाहिल्यामुळे आकार वाढ वाढत त्यांचे घळीत रूपांतर होते. घळीमळे जमिनीचे तुकडे पडतात. त्या पोटखराब झाल्यामुळे, त्यात काही कायिक बदल होऊन त्या वाया जातात. वरची माती वाहून मुरुम किंवा खडक उघडा पडल्यामुळे काही जमिनी बंजर बनतात तर काही घळी पडल्यामुळे सोडून द्याव्या लागतात. ऱ्हास पावलेली जमीन पुन्हा सुधारत नाही आणि सुधारलीच तर तिला पूर्वपदावर येण्यास कैक शतके लागतात. उजाड प्रदेश निर्मनष्य होतो.

प्रा. बापू अडकिने, परभणी
मराठी विज्ञान परिषदेच्या कुतुहल या सदरातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..