नवीन लेखन...

जाणिव आणि भान

काल सकाळी लेकीच्या धडपडीमुळे दुसरी लस मिळाला. सकाळी साडेआठला घरातून निघालो. दवाखान्यात लवकरच गेलो. गर्दी होती. पण मला अजिबात त्रास झाला नाही कारण. लेकीने आमच्या अगोदरच तिथे जाऊन माझ्या साठी व्हिलचेअरची सोय केली होती म्हणून गाडीतून उतरून त्यावर बसवून मला लेकीने आत नेले. तोवर मुलगा गाडी लावून आला वडिलांना घेऊन. खुर्च्या बऱ्याच होत्या पण त्या अपुऱ्या पडत होत्या. माझी सोय या खुर्चीवर असल्याने मी एका बाजूला बसले होते. निरिक्षण करण्याची सवय आहे म्हणून ते करत होते. ज्या ठिकाणी मी बसले होते. तिधे उंबराची सावली होती. खूप वर्षांनंतर असा योग आला होता मग काय दत्त महाराजांच्या कृपेने संधी मिळाली. नामस्मरण करत होते. आणि समोरच पिंपळाचे झाड. व्वा छानच वाटणार ना? हळूहळू गर्दी वाढत होती. डुलत डुलत. काठीचा आधार. एखाद्या व्यक्तीला बरोबर घेऊन अनेक जेष्ठ नागरिक येत होते. आणि जोडीने बसत होते. वेळवर लसीकरण सुरू झाले…..
पोलीस व व्यवस्थापक येताच एकदम सगळेच उठून पुढे पुढे येऊ लागली होती. मला आठवण झाली ती स्टेशन व बसस्टॉपची. शांत बसलेले गाडी. बस कंडक्टर येताच जशी धावत पळत सुटतात. आणि गर्दी मुळे सगळ्यांनाच त्रास होतो. पण इथे असे करण्याची गरज नव्हती. अगोदर नंबर असलेले कागद प्रत्येकाला देण्यात आले होते पण सवय…. आता इथले निरिक्षण. त्यांची बायको सांगते आहे की आपण थोडे बसु या. आपला नबंर लांब आहे पण ते ऐकणारे आहेत थोडेच. उलट त्यांना न जुमानता पुढे गेलेच मग काय बिचारीला जावे लागले मागे मागे. तिथे गेल्यावर दोन भागात पाठवले जात होते. आणि लस दिल्यानंतर दहा मिनिटे बसावे लागते. पैकी ते एका व त्या एका भागात गेल्याने त्यांना आधी लस मिळाली. व बायकोला रांगेत जावे लागले होते म्हणून थोडा वेळ लागला. त्यानंतर त्या बाई बाहेर येऊन बसल्या तोच ते आले आणि हाताने खूण केली की चला. यांनी हाताने खूण केली दहा मिनिटे थांबा. पण तोवर त्यांनी तीन चार चकरा केल्या व चलण्याची खूण केली. इथेही तिची सवय चारचौघात नको म्हणून मुकाट्याने उठून गेली पाठोपाठ… एक जोडपे आले ते आत जाण्यापूर्वी दारातच असलेल्या खुर्चीवर बसलेल्या बायकोच्या हातात अंगातील सदरा काढून दिला व आत जाऊन लस घेतली. तोवर बाहेरच्या बाजूला बसलेल्या त्या बाईना लस देण्यासाठी दुसरे आले होते. आता तो सदरा. पिशवी सांभाळून ती लस घेण्यासाठी सहकार्य करत होती. ते बाहेर आले मग पटकन सदरा घ्यायला हवा होता पण ते आधी कापूस योग्य जागी टाकून मगच घेऊन पुढे गेले. मग या गेल्या. दहा मिनिटे बसण्याचा नियम सगळ्यांना सारखाच असतो आणि ती काळजी पोटी असते. मग आपले झाले की चला म्हणताना जाणीव ठेवायची होती. तर दुसरीकडे आपला एक सदरा आपण सांभाळून घ्यायला हवा. त्या पिशवी सदरा एकट्या सांभाळत कशी लस घेणार याची जाणीव ठेवायला हवी होती….
एकटेच आलेले एक सदरा खांद्यावर टाकून दारात उभे. आतील एक जण बाहेर आल्यावर हे आत गेले. घरात अंगावर टॉवेल टाकून अंघोळीला जात असल्या सारखे. आणि मग शेवटच्या खुर्चीवर जाऊन बसून निवांत पणे सदरा अंगात घातला. एवढ्या लोकातून असे आपण जात आहोत याचे भान ठेवणे आवश्यक होते. खर तर लसीकरणासाठी जाताना कोणते कपडे वापरायला हवेत याचेही भान ठेवावे.
खूप दिवसांनी असे सगळे मास्क लावून असलेले लोकांना पाहून वाटले की अवघा मास्क एकचि झाला. आणि तिथे आपली आपल्यासाठी काम करणारे सेवेकरी मात्र डोक्यापासून पायापर्यंत संरक्षण कवच घालून अहोरात्र फक्त आणि फक्त डोळे उघडे ठेवून काम करणारे बहुतेक सर्व तरुण पिढी अशा वेळी जाणिव व भान ठेवून वागणे बरोबर वाटत नाही. आताची लहान मुले देखील उघडी बाहेर येत नाहीत. एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या व तिथे कार्यरत असलेल्या लोकांना काय वाटेल याची जाणीव व भान ठेवलीच पाहिजे. आणि हो नवरेपणाचा हक्क घरातही असू नये. त्यातल्या त्यात बाहेर तरी नक्कीच गाजवू नये..
अश रितीने आमच्या दोघांच्या लसीकरणाचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. त्यामुळे चारी धाम यात्रा सफळ संपूर्ण झाल्यासारखे वाटले. आणि विनंती आहे की ही जाणीव व भान याचे भान तुम्ही ठेवून लसवंत व्हावे… ??
— सौ कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..