जन्मभूमीपासून दूर,मातृभूपासून वंचित,
लहान मुलासारखाच मी, तिच्यासाठी सदैव सद्गदित,—!!!
उठे स्मृतींचे मोहळ,
स्मरणांच्या माशा डंसत,
भारतीय म्हणून मी,—-
झुरतो तिच्यासाठी अविरत,—!!!
थांबे ना कुणासाठी काळ ,
मागेमागे धावे मन,
आलो जेव्हा परदेशात,
उदास होतो आत उरांत,—!!!!
खडी करण्या कारकीर्द,
मनात होती खूप उमेद,
आईपासून तुटले मूल ,
सारखी जिवा वाटत खंत,–!!!
नीतिमंत तो भारतीय ,
असे नाव काढाया सज्ज, संस्कारांचा असे प्रश्न,
संस्कृतीचा पाईक अत्यंत,–!!!
वाटे मज अभिमान,
एक भारतीय म्हणून,
चांगले तेवढेच घेत ,
भारतीय मी कर्तृत्ववान,–!!!
कवटाळीत उराशी स्वप्न,
एक दिवस तिथे येईन,
करत आपल्या जनांचा उद्धार,
देशां, माझ्या समृद्ध करेन,–!!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply