नवीन लेखन...

जन्मदाता – पडद्यामागचा कलाकार

वडील, या शब्दात सगळ काही सामावलेले असते. ते कसे बघुया.

वडील म्हणजे आधार. प्रत्येक व्यक्तीला जीवनात आधाराची गरज असतेच आणि जर त्या वेळेस त्या व्यक्तीला त्याच्या वडिलांचा आधार भेटला तर तो पूर्ण जग जिंकू शकतो. बाप हा त्याचा मुलाला जन्म देण्या पासून ते त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याला यश कस प्राप्त होईल ते बघत असतो. मुलं पण जर स्वतःच्या बापाचे कष्ट समजून घेणारे असतील तर बाप नक्कीच यशस्वी होतो.

लहान पणापासून मूल मोठे होई पर्यंत त्यांचा बाप त्यांच्या साठी खूप झटत असतो. श्रीमंत असो या गरीब बाप हा त्याच्या पातळी नुसार काम करून मुलांना शिकवतो. यात अमीर गरीब असे काही नाही. बापाला स्वतःच्या मुलांना चांगले घडवण्यासाठी मेहनत करावीच लागते. लहानपणी ऑफिस मधून घरी आल्यावर मुलांना शिकवणे, त्यांच्या सोबत खेळणे, बाहेर फिरायला घेऊन जाणे असे वेगवेगळे गोष्टी करतो.

स्वतःचे दुखणे विसरून परिवाराला सांभाळतो. वडील म्हंटले की खूप मोठी जबाबदारी त्या बापाच्या आंगावर पडलेली असते. आई चे महत्व तर खूप आहेच, पण वडिलांची भूमिका लहान मुलांना मोठे करण्यापर्यंत खूप महत्त्वाची आणि अनमोल असते. खरे पाहता बऱ्याच मुलांना या गोष्टीची जाणीव असते की माझ्या बापानी माझ्या साठी काय केले !!…

एका बाप जेव्हा मुलाला रागावतो तेव्हा त्याच्या मनातून तो खूप रडत असतो. बापाचे मन खूप हळवे असते. आपल्या मुलीला – मुलाला चांगले संस्कार पडावेत म्हणून त्याची झटपट चाललेली असते. मुलींसाठी तर त्यांचे वडील हिरो असतात. मुलींचे वडील मुलींना लहान पणापसून मोठे होई पर्यंत चांगली वागणूक देतात, प्रेम देतात , माय देतात आणि मुलीची बिदाई होत असताना आई चे अश्रू सगळ्यांना दिसतात पण बापाचं रडणार काळीज कोणाला दिसत नाही. तेव्हा बाहेरून कठोर दिसणारा बाप जा आत्मधून दुपटीनी हळवा झालेला असतो.

परिवारासाठी झटणारा बाप हा कितीही बाहेरून कठोर दिसत असला तरी तो आत्मधून तितकच प्रेमळ सुद्धा असतो. कधीही मनातल्या भावना जास्त समोर न येऊ देता परिवाराचे संतुलन नेहमी व्यवस्थित ठेवतो. स्वतःच्या मुलांच्या शिक्षणात कधी काही कमी पडू नये म्हणून बरेच वडील दोन वेळेस चे काम करून मुलांना पैसे पुरवतात.

स्वतःच्या ताब्यतीकडे दुर्लक्ष करतात. मुलींचे लग्न कार्य साठी रात्रं दिवस एक करून कर्ज काढून लग्न पार पाडतात. मनातून कितीही दुःख , त्रास होत असेल तरीही बापाच्या चेहऱ्यावर तिळमात्र पण वेदना न दाखवता तो हसऱ्या चेहऱ्याने घरातले कार्य पार पाडण्याचा प्रयत्न सतत करत असतो.

बरेच मुल – मुली अशे पण आहेत की जे स्वतःच्या संस्कार विसरतात. वडिलांनी कमावलेल्या पैशाचा जोरावर उडतात. उधळंपटी करतात. वडिलांशी खोटे बोलणे, त्यांना उलट उत्तर करणे , मनात येईल तसे वागणे अशे बरेच गोष्टी करतात. तेव्हा तो बाप आत्मधुन खूप रडत असतो. स्वतःचे मुल आणि मुली कशे ही वागले तरी त्यांना नेहमी वाचवणारा आणि त्यांचे सुख शोधणारा हा तो बापच असतो.

माझ्या मते, मुला – मुलींनी स्वतःच्या वडिलांची भूमिका समजायला हवी. वडील जशे मुलांच्या मनातले ओळखतात तशे मुलांनी त्यांच्या बापाच्या मनात काय चाललय हे ओळखायला हवे. बापाचा मुलांवर आणि मुलांचा बापावर विश्वास नेहमी असायलाच पाहिजे. तरच दोघांमध्ये प्रेमाचे नाते संबंध टिकून राहते.

गरीब घरातील रिक्षा चालवणारे , कटला चालवणारे वडील दिवसभर राब राब कष्ट करून दोन वेळेचं भाकर तुकडा घेवून स्वतःच्या पिल्लांचे पोट भरतात. बरेचदा तर स्वतः उपाशी राहून त्यांना जेऊन घालतात. पाऊस असो या कडक उन वडिलांच्या डोळ्यांसमोर एकच गोष्ट असते ती म्हणजे आपला परिवार, आपली मुले.

मला माझ्या लहान पणी खूप सारे खेळणे भेटायचे रोज माझे बाबा मला नवीन नवीन गोष्टी, खाऊ आणून द्यायचे. पण बाबा मला वेळ हवा तितका देऊ शकत न्हवते. मला नेहमी ते म्हणायचे की ऑफिस ला चाललो काम आहे. मला वाईट वाटायचे. पण आता कळते की ते मला का वेळ देऊ शकत न्हवते. मी स्वतः बाप झालो तेव्हा मला कळले की मला माझ्या मुलाला चांगले घडवण्यासाठी त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मला महेनत करणे गरजेचे आहे. स्वतःच्या मुलांचे बालपण पण वडिलांच्या हातातून कामामुळे निसटून जातात.

सतत त्या जन्मदात्याचा मनात चिंता राहत असते की मला काही झाले तर आपल्या मुलांचे काय होईल ? कसं होईल ? अशे अनेक विचार येतात जातात. स्वतःच्या मनाची अवस्था कोण कडे न सांगता जिद्दीने पेटलेला बाप तो मुलाला त्याच्या योग्य दिशेने ढकलत असतो. बाप हा स्वतःच्या मुलाचा एक मित्र म्हणून सुधा खूप चांगली भूमिका बजावतो.

Father’s day हा वर्षातून एकदाच येतो. पण माझे म्हणणे आहे की तो दिवस प्रत्येक मुला मुलींच्या आयुष्यात रोज असायला हवा. वडील हे वर्षातून एकदाच स्वतःच्या मुला मुलीं साठी काम करतात का ? नाही न, तर मग आपण का म्हणून एकदाच तो दिवस साजरा करायचा !. म्हणून रोज हा दिवस वडलांसाठी असायलाच हवा.

वडील या जन्म दात्याचे त्रूण हे आयुष्यात कधीच कोणी फेडू नाही शकत. वडील हा एक वट वृक्ष आहे. जो पूर्ण परिवाराला सावली देतो. वडील म्हणजे संस्कार, आधारस्तंभ, प्रेरणा , अस्तित्त्व, समाधान , कठोर , संवाद आणि विश्वास या सगळ्या गोष्टी त्या जन्मदात्यामध्ये सामावलेल्या असतात. म्हणून मी म्हणतो वडील हे पडद्यामागे राहून कुटुंबाला दिशा दाखवतात. जन्मदाता हा पडद्यामागचा कलाकार असतो. जो कधी समोर येत नाही पण यशा पर्यंत पोहोचवतो. आणि काही चुकले ते स्वतः समोर येतो पण काही जिंकले तर कुटुंबाला समोर करतो.

जन्मदाता हा पडद्यामागचा कलाकार असतो……..

निनाद चंद्रकांत देशपांडे
अमरावती
९९२२६१३००१

Avatar
About निनाद चंद्रकांत देशपांडे 8 Articles
माझ्या बद्दल माझे लेख च आपल्याला सांगतील....
Contact: YouTube

1 Comment on जन्मदाता – पडद्यामागचा कलाकार

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..