जन्माला आलो तर
मरणं ही ठरलेलं आहे,
कुणाचं लवकर जाणं
हे विधिलिखित आहे
कोण कसं लवकर गेलं
ही हळहळ व्यक्त होते,
आयुष्य असेल थोडं
तर नशीब ही रुसते
लहान मोठं वय ह्याचा
संबंध मग राहतं नाही,
मरणदारी नौका जाणं
सत्य मग टळत नाही
किती करा टेस्ट आणि
किती खा गोळ्या,
हृदय बंद पडेल कधी
न कळेल वेळ तेव्हा
कोण न ह्याला अपवाद
न कोण ह्यातून सुटला,
क्षण भंगुर आयुष्य हे
न रहावा कधी राग रुसवा
मी ही जाईल अशी अचानक
हृदय हलकेच बंद पडता,
काव्य हृदयावर करता करता
धडधड वाढेल मग तेव्हा
नसेल भरोसा कसला तो
कोण जाईल सोडून केव्हा,
आठवणी उरतात मागे साऱ्या
ह्यालाच उत्तरायण म्हणतात
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply