जन्मले पृथ्वी वरती
अहंकार मातेस नाही
विश्व घडण्या दाखले
आई न कधीच देई!!
अर्थ–
शिखर हे कधीच स्वतःच्या मी पणाचा दाखला देत नाही, कारण त्याला उंची प्राप्त होते ती एकावर एक साचलेल्या मातीच्या थरांमुळे. केवळ जीव बनून जन्माला घालणे हे सृष्टीच्या हातात असते पण त्या जीवाला दगड बनवायचे की सर्वांना एकत्र घेऊन शिखरावर पोचणाऱ्या मातीसारखे बनवायचे हे आईच्या आई पणावर अवलंबून असते. कुठलीही माता बाळास जन्म दिल्याचा मीपणा बाळगत नाही. तर बाळाने मोठं झाल्यावर अंगात बळ आल्यावर त्या वृत्तीचा मीपणा बाळगणे योग्य कसे?
श्री समर्थ म्हणतात की प्रपंची जो अप्रमाण / तो परमार्थी खोटा म्हणजे काय? जो कर्म करताना अजिबात कुचरत नाही, आपल्या आवडीच्या कामात स्वतःला झोकून देण्याची ज्याची वृत्ती आहे त्याला भगवंत साथ देतोच पण, या सगळ्या कर्माच्या प्रवाहातून प्रवास करताना जर घरच्या लोकांना कमी लेखले गेले, त्यांना मीपणाच्या डोहात सतत बुडवले गेले तर परमार्थ कितीही करा त्यात तुम्हाला भगवंत प्राप्त होणार नाही.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply