नवीन लेखन...

जनसंघ संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी

ज्येष्ठ विचारवंत व जनसंघाचे संस्थापक-अध्यक्ष श्यामाप्रसाद_मुखर्जी यांचा जन्म ६ जुलै १९०१ कोलकत्ता येथे झाला. बंगालमध्ये एका सुविद्य व सुखवस्तू कुटुंबात जन्मलेले श्यामा प्रसाद स्वत:सुद्धा उच्चशिक्षित होते. लंडनमध्ये राहून त्यांनी बॅरिस्टरची पदवी मिळवली. पण केवळ वकिली करून पैसे कमावण्यात त्यांना रस नव्हता.

वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी ते कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू झाले. त्यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात बंगालीत भाषण देण्यासाठी पाचारण केले, तेव्हा खळबळ उडाली. तरुण वयातच ते सार्वजनिक जीवनात उतरले. त्यांचा राजकीय प्रवास मात्र नागमोडी वळणांनी झाला. ते काँग्रेसचे विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून बंगालच्या प्रांतिक विधिमंडळात निवडून गेले पण दोनच वर्षांत काँग्रेसने प्रांतिक सरकारांवर बहिष्कार टाकल्यावर राजीनामा देऊन बाहेर पडले.

१९४१-४२मध्ये ते बंगालचे अर्थमंत्री होते. नंतर त्यांनी हिंदु महासभेत प्रवेश केला व ते या संघटनेचे अध्यक्षही झाले. बंगाल विधानसभेत ते विरोधी पक्षनेता बनले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हंगामी सरकारात पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्र्याची जबाबदारी दिली. पण १९५० मध्येच त्यांचे नेहरूंशी खटके उडाले व पाकिस्तानबरोबरच्या ‘दिल्ली करारा’चा निषेध म्हणून ते सरकारातून बाहेर पडले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तेव्हाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजींशी विचार विनिमय करून श्यामा प्रसादांनी २१ ऑक्टोबर १९५१ रोजी भारतीय जनसंघाची स्थापना केली. १९५२च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांत जनसंघाने तीन जागा जिंकल्या. जन्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्यास त्यांचा ठाम विरोध होता. त्या काळात नेहरू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानाचा दर्जा देण्यास तयार होते. काश्मीरात जाण्यासाठी भारतीयांना प्रवेशपत्र घ्यावे लागे. श्यामा प्रसादांनी त्याला विरोध करून। ‘विना परवाना’ काश्मीरमध्ये प्रवेश करून आंदोलन पुकारले. ‘एक देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान नहीं चलेंगे’ अशी त्यांची घोषणा होती. त्यांच्या आंदोलनाला काश्मीर व सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळाला. श्यामा प्रसादांनी ११ मे १९५३ रोजी काश्मीर खोऱ्यात प्रवेश केला. तिथे त्यांना अटक होऊन श्रीनगरला स्थानबद्धतेत ठेवण्यात आले. तिथेच २३ जून १९५३ रोजी त्यांचे निधन झाले.

संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..