७ डिसेंबर – आजच्या दिवशी १९४१ साली जपानने पर्ल हार्बर वर हल्ला केला.
७ डिसेंबर १९४१ रोजी सकाळी जपानी बॉम्बर्सनी पर्ल हार्बरमधील यूएस नेव्ही बेसवर कोणताही इशारा न देता कार्पेट बॉम्बिंग केली होती. जपानच्या एअरफोर्सने अचानक अमेरिकेवर हल्ला केला होता. त्यात अमेरिकेचे सुमारे २,५०० नागरिक मारले गेले होते. तसेच नेव्हीची १८ जहाजेही उध्वस्त झाली होती. हल्ल्यात अमेरिकेच्या आठपैकी सहा युद्धनौका, क्रूझर, डिस्ट्रॉयरसह एकूण २०० हून अधिक एअरक्राफ्ट उध्वस्त झाले होते. जपानच्या एअरफोर्सकडून अचानक झालेल्या या हल्ल्यात अमेरिकेचे २,४०३ सैनिक मारले गेले होते. तर १,१७८ जखमी झाले होते.
७ डिसेंबरचा हवाई बेटांवरचा सूर्योदय नेहमीप्रमाणेच निसर्गरम्य होता.रविवारीच्या सुट्टीच्या रम्य स्वप्नात बहुतेक सर्वजण अंथरुणात पहुडले होते. थोड्याच क्षणात तेथे वेगवेगळ्या आवाजांचा कोलाहल माजला. गोळ्यांचे सु..सु आवाज, फुटणाऱ्या बाँबचे आवाज, जाग्या झालेल्या अमेरिकन तोफांच्या गर्जना आणि या सर्वांच्या आगीत जळण्याचा एक विशिष्ट वास याने युद्धाचा तो रंगमंच व्यापून गेला. त्या रंगमंचाचा थोड्याच वेळात नरक झाला. पर्ल हार्बरवरील अमेरिकेचे सैनिक या अचानक हल्ल्याने थिजले. त्यांची विचारशक्ती काम करेनाशी झाली. ॲडमिरल किमेलचा चेहरा पांढराफटक पडला. त्याने कसेबसे स्वत:ला सावरले. फोर्ड बेटांचा ऑपरेशन ऑफिसर कमांडर लोगन रामसेने जपानने पर्ल हार्बरवर हल्ला चढविला आहे ही बातमी प्रथम जगाला जाहीर केली.
जपानने दोन फेजमध्ये हल्ले केले होते. त्यासाठी त्यांनी फायटर जेट्स बॉम्बर्स आणि टारपीडो मिसाइल्सचा वापर केला होता. कमांडर मिस्तुओ फुचिदा यांच्या नेतृत्त्वात १८३ फायटर जेट्सद्वारे ओहियोच्या पूर्वेला तैनात असलेल्या जपानच्या सहा लढाऊ विमानांनी उड्डाण घेतले होते. या माणसाला देव मानणारे वैमानिक त्याच्या तुकडीत होते. पण त्याची खरी ताकद होती ते वैमानिक व पंखात असलेल्या २० मि. मी. तोफा व दोन मशिनगन. त्याची एकदम वर चढायची क्षमता व चपळपणा बघून अमेरिकेच्या भल्या भल्या वैमानिकांनी तोंडात बोटे घातली. या सगळ्यात विमानात भयंकर होती ती त्यांची टॉरपेडो डागणारी विमाने. या विमानांच्या तुकड्यांचा प्रमुख होता ले. कमांडर शिगेचारु मुराटा. याचे वय त्यावेळी ३२ होते व त्याला चीनच्या युद्धाचा चांगलाच अनुभव होता.
विमान उडाविण्याची त्याच्याकडे नैसर्गिक क्षमता किंवा कला होती असे म्हटले तरी चालेल. एक विमान पेटले की तेथे आगीचा डोंब उसळत असे. त्या ज्वाळांचा स्पर्श शेजारच्या विमानाला झाला की त्याचीही तीच गत होत असे. असे भीषण हल्ले चालू असताना आश्चर्यचकित झालेल्या अमेरिकन सैनिकांनी मोठ्या शौर्याने प्रतिकार केला, परंतु सगळी परिस्थितीच त्यांच्या विरुद्ध होती. चांगली विमाने बाजूला काढत असताना समुद्रातून काळ्या धुरांचे काळे ढग आकाशात चढत होते. त्यांच्यासमोर आता विमानांचे भंगार पडले होते. जपानी विमानांनी तीस टक्क्याहून विमाने नष्ट केली होती व उरलेली विमाने उडण्याच्या परिस्थितीत नव्हती. इकडे हिकॅम विमानतळावर काही वेगळे घडत नव्हते. तेथे ७० बाँबर विमाने अशीच एकत्र उभी केली गेली होती. त्यांचीही अशीच कत्तल झाली. या विमानांमधे प्रसिद्ध बी-१७ विमानेही होती. या विमानांची कीर्ती सगळीकडे पसरली होती. ती इतकी अभेद्य होती की त्यांना ‘फ्लाईंग फोर्ट्रेस’ असे म्हणत. या विमानांचा धसका जपानी वैमानिकांनीही घेतला होता. फोर्ड आयलंडवर ॲडमिरल बेलिंगरची टेहळणी करणारी फक्त दोन तीनच विमानेच उड्डाण करण्याच्या परिस्थितीत होती.
तंत्रज्ञ जिवावर उदार हो़ऊन विमाने दुरुस्त करायची पराकाष्ठा करत होते पण त्यांच्या कामात नियमांचा व कार्यप्रणालीचा प्रचंड अडथळा येत होता. हल्ल्याच्या दुसऱ्या फेरीत “बॅटलशिप रो” वर हल्ला चढविण्यात आला. हा हल्ला बाँबर, उंचावरुन हल्ला करण्यार्याि विमानांनी व लढाऊ विमानांनीच केला कारण सावध झालेल्या शत्रूवर टॉरपेडो डागणार्यां विमानांनी हल्ला चढविणे आता मुष्कील होते. या हल्ल्यात जपानी विमानांचे लक्ष्य होते तोडमोड झालेल्या युद्धनौकांचा पुरता नाश करणे. इतका की त्यांची दुरुस्ती नजिकच्या काळात हो़ऊ शकणार नाही. जपानच्या वैमानिकांच्या दुर्दैवाने काळ्या धुराचा इतका जाड थर तयार झाला होता की त्यांना खालचे काही दिसेनासे झाले होते. त्यांनी नाईलाजाने त्यांचे लक्ष मग इतर नौकांकडे वळविले. याच हल्ल्यादरम्यान जपानी वैमानिकांच्या नजरेस पळून जाणारी नेव्हाडा नावाची २९००० टनी युद्धनौका पडली. एखाद्या कोकरावर वाघ झडप घालतो त्याप्रमाणे जपानी विमानांनी नेव्हाडाला घेरले व तिची लंगडतोड चालवली. ९ वाजून ४५ मिनिटांनी दुसरा हल्ला संपुष्टात आला. हा हल्लाही यशस्वी झाला असे म्हणायला हरकत नाही. अर्थात या हल्ल्यात अमेरिकेच्या विमानतळांचा नाश करण्यात जपानला जास्त यश मिळाले. दोन्ही हल्ल्यात जास्त परिणामकारक कुठला झाला हे सांगणे तसे कठीण आहे. पहिल्यात नौका नष्ट झाल्या तर दुसर्याजत अमेरिकेचे हवाई सामर्थ्य खच्ची करण्यात जपानला यश मिळाले.
थोड्याच वेळात त्या दोन हल्ल्यांमधे झालेल्या नुकसानीचे चित्र स्पष्ट होत गेले. फारच मोठा विध्वंस घडवून आणला होता त्या हल्ल्यांनी! कल्पनेच्या पलिकडे! एका तासाच्या आत अमेरिकेतील सर्व वृत्तपत्रातील रकाने या बातमीने भरुन गेले. ‘नौकांचे प्रचंड नुकसान’ ‘जपानच्या नौदलाचा हल्ला’ ‘फोर्ड आयलंडवर आगीचे थैमान’ ‘प्रतिकार झाला नाही’ ‘पर्ल हार्बरच्या सर्व नौकांचे पलायन’ अशा अनेक खर्याम खोट्या बातम्या छापून आल्या.
आठच महिन्यापूर्वी (३१ मार्च १९४१) त्या दोघांनी म्हणजे बेलिंगर व मार्टीन यांनी एक गोपनीय अहवाल वर पाठवला होता., त्यात त्यांनी जपान हवाईपासून ३०० मैलाच्या आत आपल्या विमानवाहू नौका उभ्या करुन पर्ल हार्बरवर हल्ला चढवू शकतो अशी शक्यता वर्तवली होती. त्यावर त्यांनीच एक उपायही सुचवला होता. त्यांच्या मते लांब पल्ल्याची विमाने वापरुन समुद्रात खोलवर टेहळणी केल्यास हा धोका टळू शकत होता. दुर्दैवाने त्यासाठी लागणाऱ्या विमानांची संख्या जास्त होती व जी काही थोडीफार होती ती या कामासाठी उपलब्धही करुन देण्यात आली नव्हती. हा अहवाल इतका अचूक होता की जणू काही त्या दोघांनी भविष्यच वर्तवले होते. त्यांचे नशीब की ते दोघे त्याच योजनेच्या तडाख्यात सापडले.
जपानने यूएस पॅसिफिक फ्लीटचा प्रभाव कमी करण्यासाठी पर्ल हार्बरवर हल्ला केला होता. या बॉम्ब हल्ल्याद्वारेच जपानने अमेरिका आणि ब्रिटनच्या विरोधात युद्धाची घोषणा केली होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्क्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांनी ७ डिसेंबर १९४१ हा काळा दिवस असल्याचे म्हटले होते. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशीच अमेरिकाही दुसऱ्या महायुद्धात उतरला होता. त्यांनीही जपानच्या विरोधात युद्धाची घोषणा केली होती. जपानला हिरोशिमा आणि नागासाकी अणुहल्ल्याच्या रुपात या हल्ल्याचे परिणाम भोगावे लागले.
— जयंत कुलकर्णी
संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply