जरा कमी, पण झालो होतो
आपणही बेशरम एकदा
शांत आहे तसे जवळजवळ
चालला दूर आवाज किती
वाहते आहे प्रकाशाची नदी
विरघळे काळोख दोन्हीकाठचा
तुझी काया सनातन रापलेली
जणू बसले थरावर थर उन्हाचे
तुझी जरा चौकशी करावी म्हणून आत्ताच फोन केला
तुझ्या वॉलवर महिनोन्महिने का आहे रखरखाट इतका
विटलो, विरलो जितका मी वापरला गेलो
खूप चांगला होता माझा पोत अगोदर
— ॐकार जोशी
Leave a Reply