एका सफेद वालावर जलरंगाने रंगविलेली मूर्ती
बोर्निओ येथील श्री गणेशमूर्ती चतुर्भुज व बसलेल्या स्थितीत आहे. मूर्तीचे आसन जावा पद्धती प्रमाणे म्हणजे पायाच्या तळव्यांनी स्पर्श केलेला आहे. मूर्तीच्या कळसालापासून बैठकीपर्यंत प्रत्येक बाबतीत वेगळेपणा जाणवतो. परंतु भारतीय संस्कृतीशी तो निगडीत असल्याचा प्रत्यय येतो. संशोधकांना मात्र ही मूर्ती वैचारिक आवाहनात्मक वाटते.
ह्या श्री गणेश मूर्तीचे शिवाशी फारच जवळीक (सख्य) वाटते. कपाळावर लहानसा मुकुट असून भगवान शंकरासारख्या जटा काखाविण्यात आल्या आहेत. मुकुटाच्या मागे केसांचा जणू बुचडाचं मुळात गोळा अश्या पट्ट्याने बांधलेला व चंद्रकोरीने भूषाविलेला आहे. ह्या मूर्तीचा पूढील डावा हात पायावरच ठेवलेला असून त्याने पात्र धरलेले आहे व त्यावर सोंड आलेली आहे. तसेच पूढील उजव्या हातात मोडलेला दांत असून तो हात गुडघ्यावर ठेवलेला आहे. हे ह्या मूर्तीचे वैशिष्टय होय. तसेच या मूर्तीच्या मागील उजव्या हातात डमरू दाखविण्यात आलेले आसून डाव्या हातातील शस्त्र मात्र ओळखण्यास कठीण आहे.
जटाधारी गणेश हे या मूर्तीचे खास वैशिष्टय होय. ह्या मूर्तीच्या हातात व पायात दागिने असले तरी गळ्यात मात्र दोन्ही खांद्यावरून उतरणारा सर्पहार आहे. आणि सर्पाचे तोंड डावीकडे आहे हेही मूर्तीचे एक वैशिष्टय म्हणावे लागेल. बोर्निओ शिवाय इतरत्र अशा स्वरूपातील मूर्ती आढळत नाही. डोळे माणसासारखे आणि भुवया सुंदर कोरलेल्या आहेत. दोन्ही डोळ्यांच्या मध्ये कपाळावर ऊर्णा आहे. कपाळावर असलेला हा भाग बौद्ध तत्वाचा प्रसारक वाटतो परंतू मूर्तीवर भगवान शिवाची छाप असल्याने तो त्रिनेत्र असावा असे वाटते. अर्थात याबाबतीत मतभेद आहेत.
ही मूर्ती कोम्बेग येथील एका गुहेत मिळाली. मूर्ती धार्मिक विधीकारता उपयोगात आणलेली नाही. शत्रूच्या हल्यापासून वाचाविण्याकरता मूर्ती दडवून ठेवण्यात आली असावी असा अंदाज आहे. येथे सार्वजनिक स्वरुपात श्री गणेश उपासना होते हे येथील विशेष होय.
बोर्निओत वैदिक धर्म अस्तित्वात होता हे सिद्ध करणारा एक शिलालेख कोटई येथे सापडला आहे. तो ५व्या शतकातील आहे. त्यात वैदिक, धार्मिक विधी ब्राह्मण पुरोहिताकडून करून घेतल्याची नोंद केलेली आहे. कोम्बेन येथील लेण्यात मिळालेली ही गणेशमूर्ती मलाया द्विकल्पातील सर्वात जुन्यापैकी एक असे समजण्यास हरकत नाही.
।। ॐ गं गणपतये नम: ।।
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply