सातू एक जंगली झाड. ते कोठेही तसेच कुठेही उगवते. इंग्रज लोक याला बार्ली असे म्हणतात. आपल्याकडे कोणतेही स्त्री बाळंतीण घरी आली की तिला बार्ली वॉटर हे देण्यात येते. मात्र रशिया, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया तसेच टर्की येथे सेतूला प्रचंड मागणी आली आणि आजमितीला बार्लीचे उत्पादन जगामध्ये सातवा क्रमांक आहे. काय या बार्लीमध्ये? हे गवत त्याचे झोपडून काढून धान्य मोकळे करतात व ते गव्हासारखे दिसते. या अरब लोकांनी ते पाणी घालून आंबविले व नंतर ते पाण्यात घालून त्याची दारूसारखी भट्टी केले व त्या बार्लीचे नाव ठेवले बीअर. आणि मग ते लोकांना बाटलीत भरून विकण्यास सुरुवात केली. ही बीअर सगळीकडे फारच पसंत पडली आणि मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली. मात्र हे लोण शेवटी तिबेटमध्ये पसरले. हे सेतू अगदी गव्हासारखे दिसते म्हणून याचा उपयोग खाण्याकरता सुरू झाले व ते चांगले धान्य म्हणून लोकप्रिय झाले व प्रमुख अन्न म्हणून तिबेटमध्ये उदयास आले व त्याची लागवडही सुरू केली. आता बार्लीचे उत्पादन खूपच वाढले कारण घोडा अथवा बैलांना जशी शक्ती येते म्हणून बार्ली घोडयाकरिता देण्यास सुरुवात केली. आता आज काय बार्लीवॉटर तर नुसते बीअर नाही तर एक व्हिस्कीसुद्धा बनविण्यास लोकांनी सुरूवात केली.
बालीवरील पापुत्रे काढल्यावर बार्लीचा भात पचावयास हलका असतो. तसेच आता बार्ली साफ करून त्याचे बिस्कीट तयार करता येतात.
आयुर्वेदात जव किंवा सातू याना राय असे म्हणतात व ते अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. तसेच राय म्हणजेच बार्लीवॉटर हे सर्व शास्त्रज्ञ यांच्या मते राय हे गरम पाण्यात उकळून ते जवळजवळ दीड तास उकळत ठेवून हे पिण्यास त्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य सुधारते. त्याप्रमाणे पाण्याची काम करण्याची प्रोत्साहन मिळते. मात्र बार्ली वॉटर एक नवीन प्रकार असून ते डॉक्टरांचे मत घेऊनच मग करावे. बार्ली वॉटर पिण्यासही चांगले असते, असे म्हणतात.
– मदन देशपांडे
Leave a Reply