न प्रेम मला पत्नीचे पुत्राचा न मोह मला ।
दुर्लक्षिलेच मी सुयश प्रसिद्धी- वैभव मान सन्मानाला ॥
जीवनातल्या आनंदोत्कर्षाचे मला न कसले लोभ कशाचे ।
ध्येय आमुचे, निर्धार आमुचा – देशासाठी बलिदान प्राणांचे ॥
नाव स्मरणाची बातच सोडा, क्षुद्र धूळही जेथे मला विसरते।
प्राणांची बाजी लावेन, मेल्यावर पण याद फिरुन कोणाला येते ॥
इतिहासात अमर होईन, नाही-नाही बलिदान असे हे माझे ।
विश्वातून उठेन जेव्हा मी; विस्मृती घेरील पराक्रम माझे ॥
विसरो ते पामर मला परंतू कर्तव्याशीच माझी जवळीक ।
ज्या मातीचा देह हा बनला, माती नि तो होईल एक ॥
दांभिक जनहो पहाल तुम्ही विजय-वृक्ष हा फुललेला ।
ओळखाल लाल रंग का हो, तो फुलांवर पसरलेला ॥
सार्थक होईल तेव्हाच माझे, मान लाभेल बलिदानाला ।
जेव्हा समजून घ्याल तुम्ही हो रक्ताच्या या थेंबाथेंबाला ॥
— यतीन सामंत
Leave a Reply