जे केले ते न करायचे
कुणा कधी कसे पुसायचे
कोण सांगेल कसे जगायचे
मिळावा योग्यव्यक्ती
रानात कुणी भेटावा साधू
पहावा प्रथम नाही ना अधू
विश्वास ठेवुनी घ्यावा प्रसादु
साक्षात्कार होईल…
अर्थ–
जे केले ते न करायचे, कुणा कधी कसे पुसायचे, कोण सांगेल कसे जगायचे, मिळावा योग्यव्यक्ती
(आयुष्यात कोणत्याही वेळी काय करायचे हे कसे ठरवायचे? मग लहान मूल असो किंवा पूर्ण वाढ झालेला माणूस त्याला कोणीतरी उपदेश देणारा लागतोच. खरंतर उपदेश देणारा असावा कारण काय करायचे आणि काय न करायचे हे माहीत असणे गरजेचे असते. केवळ मित्र या कोर्स ला जातोय म्हणून ते शिक्षण घेतलेला मुलगा नंतर आयुश्यात भलत्याच कामात व्यस्त होऊन जातो तेव्हा त्या गोष्टीचा त्रास हा सर्वांना होतो. या साठी गुरू मिळणे किंवा ज्याचे ऐकावे मनापासून असा व्यक्ती मिळणे फार आवश्यक असते.)
रानात कुणी भेटावा साधू, पहावा प्रथम नाही ना अधू, विश्वास ठेवुनी घ्यावा प्रसादु, साक्षात्कार होईल…
(शाळेत असताना झालेला मित्र किंवा कॉलेज मधे झालेला मित्र किंवा ग्रुप कोणत्या विचारांचा आहे हे जर ताडले तर वाईट संगत न लागणे उत्तम, नाहीतर एका माळेचे मणी व्हायला कोणास वेळ लागत नाही. तसेच आयुष्य घडवताना उपदेश कोण करतो ते पाहणे आवश्यक ठरते. हवेत गोळीबार करणार्याने एखाद्याला अचूक नेम लावायला शिकवणे म्हणजे हास्यास्पद गोष्ट. त्यामुळे गुरू करताना किंवा उपदेश घेताना योग्य व्यक्ती आहे अथवा नाही याची शहानिशा करून मग पुढे जावे जेणेकरुन घेतलेले निर्णय अचूक आणि सुखदायी ठरतात.)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply