दोन रिळाचे दोन धागे, एकत्र ते आले
एकमेकांत दोन्हीही, गुंफून परि गेले….१,
गुंता झाला होता सारा, निर्मित नात्याचा
शक्य होईल कसे आता, वेगळे होण्याचा….२,
खेच बसता वाढत गेला, होता गुंता
उकलून सुटणे शक्य नव्हते, त्याला आता…..३,
दोनच पर्याय होते, त्याचे पुढती
तुटणे वा एकत्र राहणे, ह्या जगती….४,
वेगळे होतील दोन धागे, तुटून जाणारे
अवशेष राहतील परि काही, जे न सुटणारे …५,
दोन मनांचा असाच होतो, गुंता ह्या जीवनी
राग-लोभ प्रेमादी भावना, जाती गुंतूनी…..६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply