जीवनातील वाटे वरती, कडेकडेने उभे ठाकले
परि वाटसरूंना सारे ते, यशातील अडसर वाटले…१,
वाट चालतां क्रमाक्रमानें, बाधा आणून वेग रोकती
ध्येयावरल्या उच्च स्थळीं, पोहचण्या आडकाठी करिती…२,
षडरिपूचे टप्पे असूनी, भावनेवर आघांत होतो
सरळ मार्गाच्या विचाराला, आकर्षणाचा खेंच बसतो…३,
पवित्र निर्मळ भावनेमध्ये, रंगाच्या त्या छटा उमटती
गढूळपणाच्या वातावरणीं, सारे कांहीं गमवूनी बसती….४,
थोडे राहता गाफील तुम्ही, जाळ्यामध्ये अडकून जातां
जीवनाचे जे साध्य असते, स्वकर्माने गमवून बसतां…५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply