सर्व दिशांनी घेरूनी येतो, मृत्यू तुमचे जवळीं
सही सलामत निसटून जाणें, हीच कला आगळी….१,
भक्ष्य त्याचे बनून जाणें, चुकत नाही कुणा,
काळाची ती भूक असूनी, माहीत असते सर्वांना….२,
अविरत चालू लपंडाव , जगण्या मरण्याचा
शेवट हा जरी निश्चीत असला, हक्क तुम्हां खेळण्याचा….३,
खेळती काही तन्मयतेने, रिझविती इतरजणां,
खेळामधले नांव करूनी, आदर्श ठरती जीवनां….४
— डॉ. भगवान नागापूरकर
9004079850
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply