शब्दभावनांची झाली उधळण
निळ्या, सावळ्या गगनात
भावफुलांना ठाऊक नव्हते
निरागस आत्मरंग ते सात
भावशब्द कोणते, रंग कोणते
मनहृदयी भावप्रितीचे गीत
आठवांचे आभाळ लोचनी
काहूर, हळव्याहळव्या मनात
ऋणानुबंधाच्या साऱ्या गाठी
ऋतुऋतुनी, बरसते भावगीत
दयाघना! गाभारी तुजपुढे
लावितो मी निरांजनी फुलवात
मंद मंद उजळता दिशा दिशा
कानी मुरलीधराचे मधुर संगीत
©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ११७.
३० – ८ – २०२१.
Leave a Reply