गावाबाहेर नदीच्या काठावर एका झोपडीत एक सत्पुरुष राहात होते. ही झोपडी त्यांनी स्वतःच बांधली होती. नदीच्या काठावरच शंकराचे देऊळ होते. तेथे दर्शनासाठी बरेच लोक येत. सर्व लोक निघून गेल्यावर हे सत्पुरुष त्या मंदिरात जायचे व त्या मंदिराची स्वच्छता करायचे. त्यांचा हा दिनक्रमच होता. काही लोक त्यांच्या दर्शनाला यायचे मात्र ते सत्पुरुष कोणाकडे काही मागायचे नाहीत वा कोणी दिले तरी ते घ्यायचेही नाहीत. स्वतः कष्ट करून पोटासाठी लागेल तेवढीच ते कमाई करायचे. एकदा त्यांच्याकडे एक तरुण आला व त्यांना म्हणाला की, मी आतापर्यंत जे जे केले त्यात मला अपयश आले. त्यामुळे नैराश्य आले असून, मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ जाताना तुमच्यासारख्या सत्पुरुषाला भेटावे म्हणून आलो आहे. त्या सत्पुरुषाने त्याची सर्व हकीकत ऐकून घेतली व त्याला आपल्या झोपडीत नेले. ते त्याला म्हणाले की, तुझा निर्णयच झाला असेल तर तू अवश्य आत्महत्या कर. फक्त आता मला भूक लागली आहे. मी जे काही करेन ते तूही खा व नंतर तू तुझ्या मनाप्रमाणे वागू शकतोस. असे म्हणून त्या सत्पुरुषाने घरात जे काही किरकोळ सामान होते, त्याचा उपयोग करून गव्हाची छान खीर केली. ती खीर शिजताना तिचा सुवास दरवळत होता. त्यामुळे तो तरुण सुखावला होता. खीर तयार झाल्यानंतर त्या सत्पुरुषाने खिरीचे भांडे त्या तरुणाच्या हातात देत म्हटले हे बाहेर घेऊन जा व तेथे बाहेर उकीरड्यावर फेकून दे. सत्पुरुषाचे हे बोलणे ऐकून त्या तरुणाला फारच आश्चर्य वाटले. तो म्हणाला एवढी चांगली सुंदर खीर तुम्ही बनवलेली व ती न खाता बाहेर उकीरड्यावर फेकून द्यायला सांगता. त्यावर सत्पुरुष त्याला म्हणाले की, तू जे काही करतोस तेच मीही करतो आहे. तुझे जीवन या खिरीसारखेच छान व सुंदर आहे. परंतु, तू आत्महत्या करून ते नष्ट करीत आहेस. त्या तरुणाला सत्पुरुषाच्या उपदेशातील मर्म कळले व आत्महत्येचा विचार सोडून तो त्यांचे आशीर्वाद घेऊन तेथून गेला.
About Guest Author
523 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.
Be the first to comment
महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची
रायगडमधली कलिंगडं
महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...
टिटवाळ्याचा महागणपती
मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...
Leave a Reply